esakal | "तो' माझा जिवलगा..जाऊद्या साहेब...कशाला कागद रंगवताय! 
sakal

बोलून बातमी शोधा

police2

माझी त्याच्याबद्दल काहीएक तक्रार नाही, आम्ही लिव्ह इन रिलेशन'मध्ये असून, लवकरच लग्न करणार आहोत, असे मारहाण झालेल्या तरुणीने पोलिसांना लेखी जबाबात सांगितले आहे. 

"तो' माझा जिवलगा..जाऊद्या साहेब...कशाला कागद रंगवताय! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : छत्रपती शिवाजी उद्यानात रविवारी तरुणीला मारहाण करणाऱ्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना त्याची दखल घ्यावी लागली. पोलिसांनी तरुणीला शोधून काढत तिच्यासह तिच्या कथित प्रियकराचा जबाब नोंदवला. "माझी त्याच्याबद्दल काहीएक तक्रार नाही, आम्ही लिव्ह इन रिलेशन'मध्ये असून, लवकरच लग्न करणार आहोत, असे मारहाण झालेल्या तरुणीने पोलिसांना लेखी जबाबात सांगितले आहे. 

आवर्जून वाचा - ..तो, आय लव्ह यु म्हणाला अन्‌ हिने घेतले विष 


तांबापुरात वास्तव्यास असलेला रिक्षाचालक जुनेद शेख युनूस याचे परिसरातीलच एका तरुणीशी प्रेमसंबंध आहेत. रविवारी दुपारी तोंडाला ओढणीचा मास्क बांधलेली ही तरुणी शिवाजी उद्यानात एकटीच आली होती. याची माहिती जुनेदला मिळाली. त्याने बराच वेळ दुरून तिच्यावर पाळत ठेवली आणि अचानक हातात काठी घेत या तरुणीवर तुटून पडला. बेदम मारहाणीने ही तरुणी जोरजोरात किंचाळत असल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी हिसका दाखवताच सत्य प्रकरणाचा उलगडा झाला. याबाबत "सकाळ ऑनलाइन'वर वृत्त प्रसिद्ध होताच या तरुणीचा शोध घेत तिला पोलिस ठाण्यात आणण्यात आणून जबाब घेण्यात आला. 

"तो' माझा जिवलगा.. 
या तरुणीचा अल्पवयीन असतानाच राजस्थानात विवाह झाला होता. मात्र, ती पतीपासून विभक्त होऊन कंजरवाड्यात राहते. जुनेद शेख याच्याशी गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध असून, लवकरच लग्न करणार असल्याचे तिने सांगितले. आमचे एकमेकांवर जिवापाड प्रेम असून, "लिव्ह-इन-रिलेशन'मध्ये राहतो. किरकोळ कारणावरून वाद होऊन मी घरातून निघून शिवाजी उद्यानात निघून आली होती. त्याचा राग अनावर होऊन जुनेदने हात उगारला. माझी त्याच्याविरुद्ध काहीएक तक्रार नाही, असे लेखी जबाबात नमूद केले आहे. "साहेब, त्यालाही मारू नका, सोडून द्या' अशा विनवण्या ती करीत होती. 

जुनेद हिश्‍ट्रीशिटर.. 
तांबापुरात वास्तव्यास असलेल्या जुनेद शेख याच्याविरुद्ध नंदुरबार रेल्वे पोलिसांत जबरी लूट-दरोडा, एमआयडीसी पोलिसांत तीन वेळेस दंगलीचे गुन्हे दाखल असून, त्याला ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी जुनेदवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याच्याविरुद्ध चॅप्टर केस दाखल केली आहे.