दोघांचे प्रेम जडले एकीवर.. त्यातूनच घडली भयंकर घटना..!

दोघांचे प्रेम जडले एकीवर.. त्यातूनच घडली भयंकर घटना..!

जळगाव ः येथील तांबापुरा परिसरातील गवळीवडातील पस्तीस वर्षीय तरुणाचा प्रेमसंबंधातून बुधवारी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली. मेहरुण स्मशानभूमीजवळ ही घटना उघडकीस आली. मृत तरुणाच्या शेजारीच राहणाऱ्या तरुणाने त्याचा खून केला असून पोलिसांनी दोन तासातच मारेकऱ्यांना अटक केली. 

तांबापुरा परिसरातील गवळीवाडा येथील रामबाबा कुटीया येथे अंकुश उर्फ बबलू हटकर (वय 35) हा आई, पत्नी तसेच मुलासोबत राहतो. तो खासगी वाहनावर चालक असून ज्याठिकाणी काम करायचा तेथील धुणे भांडी करणाऱ्या एका महिलेशी त्याचे प्रेमसंबंध होते. तर अंकुशच्या शेजारीच राहणारा सुभाष मिस्तरीचे देखील याच महिलेशी प्रेमसंबंध होते. या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच बुधवारी रात्री अकरा वाजता मेहरुण परिसरातील स्मशानभुमीजवळ सुभाषने अंकुशचा धारदार शस्त्राने खून केला. याप्रकरणी अंकुशच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित सुभाष मिस्तरी यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. 

मित्राने रुग्णालयात नेले 
अंकुश व अजीज हमीद तडवी हे दोघे मित्र मेहरुण स्मशानभूमीकडून जात होते. यावेळी संशयित सुभाष मिस्तरीचा अंकुशसोबत वाद सुरु होता, त्यातून सुभाषने अंकुशवर धारदार शस्त्राने वार केले. जखमी अंकुशला अजीज तडवी तत्काळ रुग्णालयात घेऊन आला परंतु, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. 

मारेकऱ्यांना त्वरित अटक 
घटनेची माहिती एमआयाडीसी पोलिस ठाण्याला मिळताच ते घटनास्थळी आले. तसेच सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी घटनास्थळाला भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक विनायकराव लोकरे, पीएसआय विशाल वाठोरे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, जितू राजपुत, विजय नेरकर, निलेश पाटील, आसीम तडवी, सचिन पाटील यांनी दोन तासातच संशयीत सुभाष मिस्तरीच्या मुसक्‍या आवळल्या. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com