esakal | गर्भाच्या आकाराचा गोळा शस्त्रक्रियाद्वारे काढला, महिलेस मिळाले जीवदान
sakal

बोलून बातमी शोधा

गर्भाच्या आकाराचा गोळा शस्त्रक्रियाद्वारे काढला, महिलेस मिळाले जीवदान

गर्भाच्या आकाराचा गोळा शस्त्रक्रियाद्वारे काढला, महिलेस मिळाले जीवदान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : कोरोना महामारीच्या कठीण काळात महिलेच्या पोटातून मोठा गोळा काढण्याची कठीण शस्त्रक्रिया जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या टीमने यशस्वीपणे पार पाडली. स्त्रीरोग विभागातील निष्णात डॉ. मिताली गोलेच्छा यांनी तब्बल दोन तास शस्त्रक्रिया करून या महिलेस जीवदान दिले.

हेही वाचा: दिलासादाय..नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे अधिक

अमळनेर येथील रहिवासी असलेली महिला बऱ्याच दिवसांपासून पोटदुखीने त्रस्त होती. एकेदिवशी एसीपीएम वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागात ती दाखल झाली. ही महिला नऊ महिन्यांच्या गरोदर महिलेसारखी दिसत होती. डॉ. मिताली गोलेच्छा यांनी तिची प्राथमिक तपासणी केली. तिच्या शरीरात गर्भपिशवीचा गोळा असून, तो कॅन्सरचा नसल्याचे निदान केले. ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असल्याने त्या महिलेला सर्वत्र ठिकाणी नकार मिळत होता.

जबाबदारी स्वीकारली

तेव्हा डॉ. मिताली गोलेच्छा यांनी तिला धीर देत आव्हानात्मक शस्त्रक्रियेची जबाबदारी स्वीकारली. या महिलेस गाठीमुळे अतिरक्तस्राव होत असल्याने रक्तक्षय होऊन जीवाला धोका निर्माण झाला होता. तिला पाच रक्ताच्या पिशव्या लावण्यात आल्या. डॉ. मिताली यांनी ही अत्यंत गुंतागुंतीची दुर्मिळ शस्त्रक्रिया कुशलतेने पार पाडली.

हेही वाचा: जळगावकरांच्या तक्रारींचे घरबसल्या निरसन

या टीमचे प्रयत्न

या शस्त्रक्रियेत त्यांना डॉ. स्नेहा सानप, डॉ. अक्षय जगताप, डॉ. हेतश्‍वी, भूलतज्ज्ञ डॉ. मनोजकुमार कोल्हे, डॉ. मानसी पानट यांचे सहकार्य लाभले. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भाईदास पाटील, उपाध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील, सहसचिव संगीता पाटील, डॉ. ममता पाटील, अधिष्ठाता डॉ. विजय पाटील, डॉ. अल्का पाटील, डॉ. नितीन कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.

येथे गर्भापिशवीची गाठ कॅन्सरची नसून ती सर्वत्र पसरली होती. ॲपेंडीक्स, युरेटर, आतडे अशा अवयवांना ती चिटकलेली होती. महिलेच्या संपूर्ण ओटीपोटाची रचना बिघडून गेली होती. ती यशस्वीपणे केली, त्याचे समाधान आहे.

- डॉ. मिताली गोलेच्छा

loading image