esakal | दिलासा मिळतोय..ॲक्टिव रुग्णांची संख्या आली १० हजारांच्या खाली
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

दिलासा मिळतोय..ॲक्टिव रुग्णांची संख्या आली १० हजारांच्या खाली

sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून स्थिर असलेला कोरोनाचा (coronavirus) आलेख मे महिन्यात काही प्रमाणात उतरताना दिसत आहे. सलग चौथ्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा (positive cases) बरे होणारे अधिक नोंदले गेले. गेल्या २४ तासांत १९ जणांचा मृत्यू झाला. (coronavirus update active patient ratio down)

फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर मार्च व एप्रिल महिन्यात संसर्गाची तीव्रता वाढली. एप्रिल महिन्यात १४ तारखेस जिल्ह्यात सर्वाधिक ११ हजार ३२१ पर्यंत ॲक्टिव रुग्णसंख्या पोचली होती. आता जवळपास महिनाभरानंतर प्रथमच ॲक्टिव रुग्णसंख्या १० हजारांच्या आत ९ हजार ७६८ पर्यंत खाली आली आहे.

हेही वाचा: ऑक्सिजन लेव्हल केवळ ५८; जगण्याची आशा होती धुसर, पण दहा दिवसातच बाबांचा लढा यशस्‍वी

बरे होणारे अधिक

मंगळवारी मे महिन्याच्या सलग चौथ्या दिवशी नव्या रुग्णांची संख्या हजाराच्या आत म्हणजे ८०८ नोंदली गेली. एकूण रुग्णसंख्या १ लाख २५ हजार ४५४ वर पोचली. दिवसभरात १ हजार ७६ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख १३ हजार ४३२ झाला आहे.

तरुणांचा बळी सुरुच

गेल्या २४ तासांत १९ जणांचा बळी गेला. त्यात ३०, ३१, ३८ व ४२ वर्षीय तरुणांचा समावेश आहे. आतापर्यंत २ हजार २५४ जण कोरोनामुळे दगावले आहेत. तर मोनिया, नॉन कोविड, कोविड संशयित, सारी यामुळे १२ जणांचा मंगळवारी (ता.४) मृत्यू झाला.

हेही वाचा: अफवांचा पेव म्‍हणून घरच्यांचा विरोध; तीने मात्र झुगारला अन्‌ केले लसीकरण

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर १५३, जळगाव ग्रामीण ३१, भुसावळ १३३, अमळनेर २७, चोपडा २९, पाचोरा १६, भडगाव १७, धरणगाव ९, यावल २५, एरंडोल १९, जामनेर ३८, रावेर ७८, पारोळा ३२, मुक्ताईनगर ७८, बोदवड ४६, अन्य जिल्ह्यातील ८.

loading image
go to top