भुसावळ तालूक्यातील निवडणूकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार  

भुसावळ तालूक्यातील निवडणूकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार   

वरणगाव : राज्यात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कांग्रेस शिवसेना या तीन पक्षांची महा विकास आघाडी असून भुसावळ तालुक्यातील येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील महा विकास आघाडी असणार आहे या निवडणुकीमध्ये वरणगाव भुसावळ नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवणार असून 27 ग्रामपंचायतीमध्ये भाजप मुक्त महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार संतोष चौधरी यांनी केले. 

पुढे बोलतांना चौधरी म्हणाले, की  वरणगाव नगरपालिकेत अठरा नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असतील तसेच भुसावळ शहरांमध्ये अवस्था बघितली तर दयनीय झाली असून विना डांबराचे रस्ते करण्यात येत आहे विकास कामे करताना गुणवत्तेकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे चांगल्या गुणवत्तेच्या कामांनी वरणगाव शहराचा विकास करणार असून भाजप भाजप मुक्त तालुका करणार आहे. असे कृषी ऊत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रवादिकार्यकर्ताचा शुक्रवारी मेळाव्यात ते बोलले. 

व्यासपीठावर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष ॲड रवींद्र पाटील महाराष्ट्र अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील उपाध्यक्ष वाय आर पाटील ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे सुधाकर जावळे नाना पवार तालुकाध्यक्ष दीपक मराठे संतोष माळी नितीन धांडे उल्हास पगारे माजी नगराध्यक्ष अरूणा इंगळे नंदा निकम रोहिणी जावळे दुर्गेश ठाकुर उल्हास पगारे व मान्यवर उपस्थित होते
 

एकनाथ खडसे अनुपस्थित
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये एकनाथ खडसे यांनी प्रवेश केल्यानंतर पहिलाच कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करतील या आशेने जुने व राष्ट्रवादी प्रवेश केलेले भारतीय जनता पार्टीचे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते परंतु या बैठकीला ते अनुपस्थित होते

धर्मनिरपेक्ष पक्ष
एडवोकेट रवींद्र पाटील म्हणाले की शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नेहमीच सर्वसामान्य न्याय देत धर्मनिरपेक्ष कार्य केले आहे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकत्र होऊन या ठिकाणी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करायचे आहे. त्याचप्रमाणे या निवडणुकीमध्ये तिकीट वाटपासाठी समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती माझ्याकडे संतोष चौधरी व एकनाथ खडसे यांच्याकडे अहवाल सादर सादर करेल त्यानंतर तिकीट वाटप केले जाईल हा आदेश सर्वांनी पाळायचा आहे.

राज्याचे वाटोळे झाले
युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी भाजपच्या काळामध्ये राज्याचे वाटोळे झाले आहे ज्याने भाजपच्या विरोधात आवाज उठवला त्याला संपवण्याचे कार्य अथवा गुन्हे दाखल करण्याचे काम करण्यात आले आहे मात्र शरद पवारांनी राजकारण बदलत महाराष्ट्राने एक आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com