esakal | जळगाव जिल्ह्यात मायक्रो कंटेंटमेंटचा फज्जा !

बोलून बातमी शोधा

जळगाव जिल्ह्यात मायक्रो कंटेंटमेंटचा फज्जा !

जळगाव जिल्ह्यात मायक्रो कंटेंटमेंटचा फज्जा !

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः शहरासह जिल्ह्यात गृहविलगीकरणात असलेल्या कोरोना पॉझीटीव्ह नागरिकांकडूनच कोरोनाचा फैलाव होत आहे. यामुळे गृहविलगीकरण बंद केल्यास आगामी आठ दिवसात जिल्हयात बाधीत होणाऱ्यांच्या संख्येत घट होईल असा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केला आहे. शासनाने मायक्रो कंटेटमेंट झोन करण्यास सांगितले आहेत. मात्र त्याची महानगरपालिकेसह नगरपालिका क्षेत्रातही अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: आधी लढाई कोरोनाशी..मग गाठ विवाह बंधनाची, नियोजित वराची अनोखी शपथ !

राज्य शासनाने पंधरा एप्रिलपासून कोरोन साखळी तोडण्यासाठी निर्बंध कडक केले. त्यात केवळ ७ ते ११ चारच तास अत्यावश्यक सेवेतील दुकांने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचेबरोबर बाधीत रुग्ण सापडल्यास त्या परिसरातील फ्लॅट, रो हाऊस, अपार्टमेंट मध्ये मायक्रो कंटेंटमेंट झोन (प्रतिबंधात्मक झोन) करून त्यात नागरिकांचा संचारास बंदीचे आदेश दिले आहेत. मात्र याची अंमलबजावणी ना जळगाव महापालिका हहीत होते आहे ना ग्रामीण भागात, नगरपालिका हद्दीत. याची अंमलबजावणीमुळे एकाद्या ठिकाणी बाधीत रुग्ण सापडला याची माहिती इतर नागरिक, शेजाऱ्यांना लवकर होत नाही. गृहविलगीकरणात असलेलेही उगाच बदनामी नको म्हणून बाधीत झाल्याचे सांगत नाही. ताप, सर्दी आदी त्रास होवून बाधीत झाले,मात्र काही त्रास होत नसले तर खासगी डॉक्टरांचे संमतीपत्र घेवून गृहविलगीकरणात राहण्यास परवानगी मागतात. मात्र तेच नागरिक सकाळी ७ ते ११ वेळेत बाजारपेठ, धान्य बाजार, भाजीपाला मार्केटमध्ये फिरून बाधीत नसलेल्यांना बाधीत करून घरी येतात. यामुळे बाधीत रुग्ण आढळला की त्याच्या घरासमोर मायक्रो कंटेंटमेंट झोन तयार करून त्या परिसरात संचारबंदी केली जाणे आवश्यक आहे. गृहविलगीकरणात असलेल्यांना मोहाडी येथील रुग्णालयात दाखल करून उपचार करणे गरजेचे आहे. यामुळे ते बाहेर फिरणार नाहीत. व इतरांना बाधाही करणार नाहीत.

हेही वाचा: रोगापेक्षा इलाज भंयकर..लसीकरण केंद्रावर धुमाकूळ !

‘कोविड’ रुग्ण शोधमोहीम कक्ष स्थापन

कोरोना संक्रमित नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी नेहरू युवा केंद्र संघटन, जळगाव यांच्या स्वयंसेवकांचा सहभाग असलेला कोविड संक्रमित नागरिक शोधमोहीम कक्ष स्थापन करण्यात आला. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी ही माहिती दिली. या कक्षात ७६२०१७०६५९ हा व्हॉट्सअॅप क्रमांक कार्यरत राहणार आहे. या मोबाईल क्रमांकावर जिल्ह्यातील जागरूक नागरिकांनी त्यांच्या परिसरात फिरणाऱ्या बाधित रुग्णाचे नाव, पत्ता इत्यादी माहिती पाठवावी. जे नागरिक अशा संक्रमित रुग्णांची माहिती पाठवतील त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. या क्रमांकावर येणारे कोणतेही इन्कमिंग कॉल स्वीकारले जाणार नाहीत. नागरिकांनी या मोबाईल क्रमांकावर केवळ व्हॉट्सॲप अथवा एसएमएसद्वारे माहिती द्यायची आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे