esakal | सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण हे भाजपचा बनाव !
sakal

बोलून बातमी शोधा

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण हे भाजपचा बनाव !

 महाराष्ट्र पोलिसांचं काम चांगलं आहे, पण सुशात केसमध्ये त्यांच्यावर राजकीय दबाव आहे.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण हे भाजपचा बनाव !

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून भाजप ठाकरे सरकाराला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. या आत्महत्या प्रकरणातून ठाकरे सरकार पडणार असे भाजपचा दावा करत असले तरी त्यांचे आमदार वाचवण्याची ही बनाव असल्याचा भाजपवर प्रतिहल्ला शिवसेनेचे स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज केला.  

सुशांत प्रकरणात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सीबीआय चौकशीची मागणी आणि त्यानंतर त्यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रभारीपदी झालेली निवड, हा योगायोग आहे,' अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली होती. यावर देवेंद्र फडणवीस हे पुण्यात मराठी पत्रकार संघ कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावर बोलतांना म्हणाले, की सुशांत केस आणि माझ्या बिहार नियुक्तीचा कवडीचा संबंध नाही. महाराष्ट्र पोलिसांचं काम चांगलं आहे, पण सुशात केसमध्ये त्यांच्यावर राजकीय दबाव आहे असे आरोप केले.

राष्ट्रवादी-शिवसेनेत कुठलेही मतभेद नाही

यावर भाष्य करतांना मंत्री पाटील म्हणाले, की 'सुशांत आत्महत्या प्रकरणी सरकार पडेल हा भाजपाचा दावा म्हणजे आपले आमदार वाचवण्यासाठी केलेला बनाव आहे असे फडणवीसांवर प्रतिहल्ला केला. तर या प्रकरणावरून राष्ट्रवादी आणि आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत,' असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे.