esakal | काँग्रेस मजबूत, मात्र वरिष्ठांचे लक्ष नाही : पाडवी
sakal

बोलून बातमी शोधा

minister padavi

नेतेच लक्ष देत नसल्यामुळे या ठिकाणी पक्षाला बळ मिळाले नाही. मात्र आगामी काळात आपण संपर्क मंत्री म्हणून वरिष्ठ नेत्यांना जिल्ह्यात लक्ष देण्यास सांगणार आहोत.

काँग्रेस मजबूत, मात्र वरिष्ठांचे लक्ष नाही : पाडवी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात काँग्रेस कमजोर असल्याचे म्हटले जात आहे; मात्र ते चुकीचे आहे. याठिकाणी काँग्रेस मजबूत आहे. पण वरिष्ठांचे लक्ष नाही. आगामी काळात आपण वरिष्ठांची ताकत जिल्हा काँग्रेसला मिळून देणार आहोत; अशी ग्वाही काँग्रेसचे जिल्हा संपर्कमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी दिली.
राज्याचे आदिवासी विकास मंत्री व काँग्रेसचे जिल्हा संपर्कमंत्री ऍड. पाडवी जळगाव दौर्‍यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनात जिल्हा काँग्रेसच्या पदाती पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डी. जी. पाटील आदी उपस्थित होते. पाडवी म्हणाली, की नेतेच लक्ष देत नसल्यामुळे या ठिकाणी पक्षाला बळ मिळाले नाही. मात्र आगामी काळात आपण संपर्क मंत्री म्हणून वरिष्ठ नेत्यांना जिल्ह्यात लक्ष देण्यास सांगणार आहोत. राज्यात असलेल्या सत्तेच्या माध्यमातून जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ दिले जाईल. त्या माध्यमातून काँग्रेस पक्ष बळकट केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेसच नंबर वन : डॉ. पाटील
माजी खासदार डॉ. उल्हास पाटील म्हणाले, की काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्यात पक्षाला बळ दिले पाहिजे. काँग्रेस पक्षात आता खऱ्या अर्थाने क्रांतीला सुरुवात झाली आहे. आगामी काळात काँग्रेस पक्षातर्फे ग्रामपंचायतीपासून सर्व निवडणुका लढविण्यात येतील. त्यामाध्यमातून पक्षाला बळ देण्यात येईल व भविष्यात खानदेश व उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसच नंबर वन असेल.

खडसेंवर टीका पण...
भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेली एकनाथ खडसे यांच्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी नाव न घेता टीका केली. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील म्हणाले, की आज मित्र पक्षात आलेल्या नेत्यांनी एकेकाळी मुक्ताईनगरात काँग्रेस नेत्यांची बदनामी केली आहे. त्यावेळी काँग्रेसच्या जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत मुक्ताईनगर आतील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आहेत. तर जिल्हा सरचिटणीस डी. जी. पाटील म्हणाले, की मित्र पक्षात आलेल्या नेत्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आहे. मात्र आता त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सोबत घेत चालले तर ठीक अन्यथा आम्ही आमचा संघर्ष कायम ठेवणार आहोत. मंत्री ऍड. पाडवी यांनी पत्रकारांशी बोलताना खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचे स्वागत केले. खडसे यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आघाडीचे बळ वाढणार असल्याचे पाडवी म्हणाले.

loading image