केंद्राच्या जनहिताच्या निर्णयाचे ऐतिहासिक वर्ष : खासदार उन्मेष पाटील 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारच्या दुसऱ्या पंचवार्षिक टप्प्यात पहिले वर्ष पूर्ण झाले आहे. केंद्रातील सरकारच्या कामगिरीबाबत खासदार पाटील म्हणाले, की केंद्रातील सरकारने वर्षभरात अत्यंत ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत.

जळगाव : जम्मू- काश्‍मीरसाठी लागू असलेले 370 कलम रद्द करून "एक देश, एक संविधान' लागू करण्यात आले. राममंदिराबाबत न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर शासनाने ताबडतोब हा प्रश्‍न सोडविला. "कॉर्पोरेट टॅक्‍स' कमी करून परकीय गुंतवणूक वाढीस चालना दिली, तर "कोरोना'च्या संकटाशी धैर्याने मुकाबला करून जगात "भारतीय पॅटर्न' विकसित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे दुसऱ्या पंचवार्षिक टप्प्यातील पहिले वर्ष ऐतिहासिक निर्णयाचे वर्ष ठरले आहे, असे मत भाजपचे जळगाव मतदारसंघातील खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केले. 

नक्‍की पहा -  गुलाबभाऊ आता हातात "रुमणे'च घ्या !

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारच्या दुसऱ्या पंचवार्षिक टप्प्यात पहिले वर्ष पूर्ण झाले आहे. केंद्रातील सरकारच्या कामगिरीबाबत खासदार पाटील म्हणाले, की केंद्रातील सरकारने वर्षभरात अत्यंत ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. जम्मू- काश्‍मीरसाठी लागू असलेले 370 कलम रद्द करण्याबाबतचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्‍न प्रलंबित होता. मात्र, दुसऱ्या टप्प्यात सत्ता मिळताच केंद्र सरकारने संसदेत ठराव मंजूर करून जम्मू- काश्‍मीरला लागू असलेले 370 कलम रद्द केले. "एक देश, एक संविधान' लागू करण्यात आले. राममंदिराबाबतचा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. न्यायालयाने त्याबाबत निकाल देताच केंद्र सरकारने समिती नियुक्त करून त्याबाबत निर्णय घेऊन ताबडतोब मंदिराचे कामही सुरू केले आहे. याशिवाय, परकीय गुंतवणूक वाढविण्यासाठी "कॉर्पोरेट टॅक्‍स'ही कमी करण्यात आला. त्यामुळे देशात परकीय गुंतवणूक वाढीस चालना मिळाली. 
 
"कोरोना' लढाईचा "पॅटर्न' 
संपूर्ण जगावर "कोरोना'चे संकट आहे. भारतातही हे संकट आले आहे. मात्र, केंद्र सरकारने अत्यंत धैर्याने त्याचा सामना केला. त्यामुळे भारतात हानी कमी झाली आहे. जगात "भारतीय पॅटर्न' आता विकसित होत आहे. 

जळगाव जिल्ह्यातही कार्य 
वर्षभरात जळगाव जिल्ह्यातही विकासकार्य झाल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, की जळगाव विमानतळावर "नाइट लॅंडिंग' मंजुरी मिळाली आहे. मुंबई- पुण्यानंतर हे देशातील पहिले विमानतळ ठरले आहे. केंद्र शासनाच्या "जलजीवन मिशन'अंतर्गत "घर-घर पाणी' योजनेत 70 टक्के घरांना पाणीपुरवठा करण्यात आला. अटल भूजल योजनेंतर्गत जिल्ह्यात 82 गावांचा समावेश करण्यात आला आहे. औरंगाबाद- जळगाव महामार्गाच्या कामास चालना देण्यात आली आहे. जळगाव ते नांदगाव महामार्ग 600 कोटी रुपये खर्च करून कॉंक्रिटचा करण्यात आला आहे. सद्यःस्थितीत सिमेंटचा पूर्ण झालेला राज्यातही एकमेव महामार्ग आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon MP unmesh patil statement centra goverment historical year