म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण जळगाव जिल्ह्यात

शासनाने या इंजेक्शनच्या पुरवठ्याबाबत धोरण निश्‍चित केले
mucomycosis
mucomycosismucomycosis
Updated on

जळगाव : कोविडमुळे (covid) उद्‌भवणाऱ्या ‘म्युकरमायकोसिस’ (Myocardial infarction) या गंभीर आजाराने (Illness) आता थैमान घातले असून, उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) सर्वाधिक १५ रुग्ण जळगाव जिल्ह्यात आढळले आहेत. जिल्ह्यामधील रुग्णाच्या राज्यातील प्रमाणानुसार या आजारावरील उपचारासाठी ॲम्फोटेरसिन-बी या इंजेक्शनचा (Amphotericin-B or injection) पुरवठा (Supply) निश्‍चित करण्यात आला आहे.

( mucomycosis highest number patients Jalgaon district)

mucomycosis
जळगावातील सक्रिय रुग्णसंख्या ९ हजारांच्या आत


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होत नाही तोच, कोविडमुळे उद्‌भवणाऱ्या म्युकरमायकोसिसचा धोका निर्माण झाला आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या राज्यात झपाट्याने वाढत असून, त्यावरील उपचारासाठी आवश्‍यक ॲम्फोटेरसिन-बी या इंजेक्शनचाही रेमडेसिव्हिरप्रमाणे तुटवडा निर्माण झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शासनाने या इंजेक्शनच्या पुरवठ्याबाबत धोरण निश्‍चित केले असून, जिल्हानिहाय सक्रिय रुग्णांच्या संख्येनुसार हे इंजेक्शन उपलब्ध करून दिले जात आहे.

mucomycosis
लुटेरी दुल्‍हन..विवाह करून पंधराच दिवस नांदायची


नाशिक विभागात जळगाव पुढे
उत्तर महाराष्ट्रात नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत १८ मेपर्यंत म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण जळगाव जिल्ह्यात आढळले आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्येनुसार त्या प्रमाणात, जळगाव जिल्ह्यासाठी ॲम्फोटेरसिन-बी या इंजेक्शनचे २५८ व्हायल प्राप्त झाले आहेत.

असे आहेत रुग्ण
जिल्हा------रुग्ण-- प्राप्त इंजेक्शन
नगर-- ८-----१३८
धुळे------- ५------८४
जळगाव---- १८----२५८
नंदुरबार---- ३----५४
नाशिक----८-----१३८
( mucomycosis highest number patients Jalgaon district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bhusawal green hydrogen project
Why were Jalgaon land officials arrested?
Jalgaon electricity supply controversy involving farmers
Smart Meter Bill
Marathi News Esakal
www.esakal.com