esakal | जळगाव मनपाःभाजपाने शिवसेनेची केली कोंडी; महासभा तहकुब
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

जळगाव मनपाःभाजपाने शिवसेनेची केली कोंडी; महासभा तहकुब

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगावः महापालिकेची (Jalgaon Municipal Corporation) आज विशेष महासभा (General Assembly) झाली. यात स्थायी समिती सदस्य, विविध समित्यांचे सदस्य आणि स्वीकृत नगरसेवकाची नियुक्ती केली जाणार होते. महासभेच्या पहिल्याच विषयावर शिवसनेच्या स्विकृत नगरसेवक निवडीच्या मुद्यावरून भाजपने शिवसेनेची (Shiv Sena) कोंडी केली. आधी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक होते, परंतू या बैठकीला भाजपच्या गटनेत्याला बोलावले नसून ही निवड चुकीची आहे. त्यावर मतदान घ्या, किंवा विषय तहकुब करा अशी भूमीका घेत भाजप सदस्यांनी शिवसेनेची कोंडी केली. दोन्ही पक्षाचे सदस्य आमने-सामने आल्याने महासभेत प्रचंड गोंधळ झाला. यावेळी शिवसेनेला अखेर महासभा तहकुब करावी लागली.

हेही वाचा: जळगावः धरण स्थळावरील पर्यटन केंद्राचा प्रस्ताव लालफितीत

जळगाव महापालाकित आज आॅनलाई पद्धतीने विशेष महासभा महापौर जयश्री महाजन याच्या अध्यक्षस्थानी झाली. उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतिष कुळकर्णी उपस्थित होते. महासभेत गटनेता पदावरून प्रचंड गोंधळ भाजप-शिवसेना सदस्यांमध्ये झाला. यावेळी शिवसेने दिपील पोकळे यांच्या नावाच्या गटनेता पदाची नावावरून भाजपच्या सदस्यांनी जोरदार याला विरोध केला. भाजपचे अॅड. शुचिता हाडांनी गटनेता पद भाजपचे असून शिवसेनेने चुकिच्या पद्धतीने निवड केली असून विभागीय आयुक्त कार्यालयात भाजपच्या गटनेतांची नोंद आहे. त्यामुळे ही निवड चुकीची आहे असल्याचे सांगत प्रचंड गोंधळ झाला. यावेळी भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालाणी, जितेंद्र मराठे, डॉ. अश्विन सोनवणे यांनी जोरदार शाब्दीक हल्ले शिवसेना सदस्यांवर केले.

हेही वाचा: या वेळेतच आजारी पडा;एका पत्राची चर्चा,जाणून घ्या काय आहे प्रकार

स्विकृत नगसेवक निवडीवरून गोंधळ

महासभेच्या पहिल्याच विषय हा शिवसेनेच्या स्विकृत नगरसेवपदी विराज कावडीया यांच्या निवडीचा होता. या विषावंरून भाजप सदस्यांन प्रचंड गोंधळ घातला. यावेळी भाजपचे सदस्यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची आधी बैठक घेवून त्यात निर्णय घेतला जातो. तुम्ही भाजपच्या गटनेत्याला बोलावलेच नसून ही निवड चुकीची असून यावर मतदान घ्या, किंवा विषय तहकुब करा अशी मागणी केली. प्रचंड गोंधळ होत असल्याने महापौरांनी शेवटी ही विशेष महासभा तहकुब करावी लागली,

loading image
go to top