esakal | जळगावः धरण स्थळावरील पर्यटन केंद्राचा प्रस्ताव लालफितीत
sakal

बोलून बातमी शोधा

Dam

जळगावः धरण स्थळावरील पर्यटन केंद्राचा प्रस्ताव लालफितीत

sakal_logo
By
देविदास वाणी


जळगाव ः जिल्ह्यात तीन मोठी धरणे (Dam), तर तेरा मध्यम प्रकल्प आहेत. यंदा चांगला पाऊस (Heavy Rain) झाल्याने सर्वच प्रकल्प पाण्याचे तुडुंब भरलेली आहेत. धरणातून पाण्याचा विसर्ग बाहेर पडण्याचे दृश्‍य पाहणे डोळ्यांचे पारणे फिटणार ठरते. नदीत सोडलेले अथांग पाणी, वाहणाऱ्या पाण्याचा खळखळ आवाज, धरण सभोवताली व परिसरात सर्वत्र हिरवीगार झाडी, असे निसर्गचित्र सध्या सर्वच धरणांवर पाहायला मिळते आहे. ही धरणे पर्यटनाची स्थळे आहेत, असे असूनही त्याठिकाणी पर्यटनासारख्या (Tourism) सुविधांचा अभाव आहे. येथे पर्यटन स्थळे (Tourism Place) ‘बीओटी’ तत्त्वावर व्हावीत, यासाठी पाटबंधारे विभागाने (Department of Irrigation) दोन वेळ जलसंपदा मंत्रालयात (Ministry of Water Resources) प्रस्ताव पाठविला. मात्र अद्यापही तो मंत्रालयात धूळखात पडून आहे.

हेही वाचा: या वेळेतच आजारी पडा;एका पत्राची चर्चा,जाणून घ्या काय आहे प्रकारजिल्ह्यातील धरणे भरल्यानंतर संबंधित धरण व परिसर पाहण्यासाठी स्थानिक पर्यटकांची गर्दी उसळते. हे लक्षात घेऊन गिरणा, सुकी, वाघूर धरणाचा परिसर बीओटी तत्त्वावर विकास करण्यात यावा, असा प्रस्ताव येथील पाटबंधारे विभागाने मुंबईला जलसंपदा विभागात आतापर्यंत दोन वेळा पाठविला आहे. मात्र गेल्या बारा वर्षांत जलसंपदा व पर्यटन विभागाने या प्रस्तावाची दखल घेतलेली नाही. पर्यटनाबाबत शासनाच्या उदासीनपणा याद्वारे दिसून येतो.
जळगाव जिल्ह्यात तापी नदीवरील हतनूर धरण, सातपुड्यातील सुकी धरण, उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठे गिरणा धरण, जळगाव शहरासह अनेक तालुक्यांना पाणीपुरवठा करणारे वाघूर धरण ही ठिकाणे जळगावमधील पर्यटनासाठी नागरिकांची आवडती ठिकाणे आहेत.

हेही वाचा: जळगावः रस्तेप्रश्नी कायदेशीर नोटिशीबाबत महापौर, आयुक्तांचे मौन‘बीओटी’वर कार्यवाही नाही
रविवार, सुटीच्या दिवशी या धरणांना भेट देण्यासाठी स्थानिक पर्यटकांची गर्दी होते. गिरणा धरण नाशिकला अधिक जवळ असल्याने नाशिकसह जळगावचे पर्यटक या ठिकाणी जातात. याठिकाणी धरणांजवळ राहण्यासाठी शासकीय रेस्ट हाउस नाही, उद्याने नाहीत किंवा चहा, नाश्त्यासाठी हॉटेलही नाहीत. स्वच्छतागृहे नाहीत. यावर उपाय म्हणून गिरणा, सुकी, वाघूर धरणांच्या परिसराचा पर्यटनासाठी बीओटी तत्त्वावर विकास केला जावा, असा प्रस्ताव गिरणा पाटबंधारे विभागाने २००७ मध्ये पाठविला होता. नंतर २०१२ मध्ये पुन्हा प्रस्ताव पाठविला होता. मात्र त्यावर अद्यापही कार्यवाही नाही. शासनाने धरणांवर पर्यटन स्थळांना मंजुरी देऊन तेथे सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी पर्यटकांची आहे.

loading image
go to top