महापौर ताई...डॉक्टर लवकर येत नाही...नाश्ता ही मिळत नाही !

महापौर ताई...डॉक्टर लवकर येत नाही...नाश्ता ही मिळत नाही !

जळगाव : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात महापालिकेने कोविड केअर सेंटर आणि विलगीकरण कक्ष उभारला आहे. रुग्णांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा योग्य आहेत की नाही, याची महापौरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाहणी केली. त्या ठिकाणी असलेल्या काही अडचणी दूर करण्यासाठी पाठपुरावा करून सोयी-सुविधा पुरविण्यात येतील, असे महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले. 


अडचणींची पाहणी करून त्या दूर व्हाव्यात, यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी सर्व गटनेत्यांची बैठक घेतली होती. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आणि आयटीआयच्या वसतिगृहातील कोविड केअर सेंटर आणि विलगीकरण कक्षाला महापौर, नगरसेवक कैलास सोनवणे, अनंत जोशी, उज्ज्वला बेंडाळे, चेतन सनकत, अमर जैन, ज्योती चव्हाण, गायत्री राणे, सुरेखा तायडे आदींनी भेट दिली. डॉक्टर, कर्मचारी, महापालिका समन्वयक तसेच रुग्णांशी त्यांनी चर्चा केली. सर्वांच्या समस्या ऐकून घेत त्या तातडीने मार्गी लावण्याचे आश्‍वासन महापौरांनी दिले. 


रुग्णांनी केल्या तक्रारी 
महापौरांसह सर्वांनी प्रत्येक कक्षातील रुग्णांशी संवाद साधला. डॉक्टर वेळेवर येत नाहीत, लहान मुलांना औषधे मिळत नाहीत, अहवाल यायला उशीर होतो, डॉक्टर व नर्सची संख्या कमी आहे, चहासोबत बिस्किटे मिळत नाहीत अशा तक्रारी रुग्णांनी केल्या. 

डॉक्टर, कर्मचाऱ्यांची मागणी 
डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी महापौरांनी संवाद साधला. आया, सिस्टर, डॉक्टर, कर्मचारीसंख्या कमी असल्याचे दिसून आले. अतिरिक्त कर्मचारी, रुग्णवाहिका, रुग्णांशी संपर्क साधायला माइक सिस्टिम हवी, समन्वयक अधिकारी आदी साहित्य, तसेच स्वॅब कक्षाबाबत समस्या मांडल्या. याबाबत आयुक्त आणि अधिकाऱ्यांशी बोलून समस्या सोडवू, असे महापौर म्हणाल्या.  

 अशी क्षमता, असे रुग्ण
मनपाकडून पॉझिटिव्ह रुग्णांसाठी ३ कक्ष तयार करण्यात आले आहे. त्यात कक्ष १ ची क्षमता ९८ असून तिथे ७८ रुग्ण आहे. कक्ष २ ची क्षमता ९६ असून ७४ रुग्ण आहे. कक्ष ३ ची क्षमता १२५ असून त्याठिकाणी १२१ रुग्ण आहेत.  शासकिय अभियांत्रिकीच्या वसतिगृहातील विलगीकरण कक्षाची क्षमता १५० तर रुग्ण ११३, तंत्रनिकेतनच्या विलगीकरण कक्ष १ ची क्षमता १२६ तर रुग्ण ९७ आहे. तसेच कक्ष २ ची क्षमता १२६ असून ११२ रुग्ण आहेत. आयटीआयच्या विलगीकरण कक्षाची क्षमता २४० असून सध्या १२५ रुग्ण आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com