व्हॉट्‌सॲप व्हिडीओ कॉलवर खटला निकाली

रईस शेख
Sunday, 13 December 2020

इतिहासात प्रथमतःच एखाद्या खटल्याचे कामकाज, सुनावणी आणि निकाल व्हॉटस्‌ॲप या सोशलमिडीया नेटवर्कींगच्या व्हिडीओकॉल सुविधेद्वारे घडवण्यात येवुन देान पक्षकारांमध्ये समेट, तडजोड आणि तत्काळ खटल्याचा निपटाही करण्यात आला आहे. 

जळगाव : राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देषानुसार शनिवार जिल्‍हा विधीसेवा आणि जिल्हा वकिलसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने लोक अदालतीचे आयेाजन करण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे इतिहासात प्रथमतःच एखाद्या खटल्याचे कामकाज, सुनावणी आणि निकाल व्हॉटस्‌ॲप या सोशलमिडीया नेटवर्कींगच्या व्हिडीओकॉल सुविधेद्वारे घडवण्यात येवुन देान पक्षकारांमध्ये समेट, तडजोड आणि तत्काळ खटल्याचा निपटाही करण्यात आला आहे. 

जलद आणि सोप्या पद्धतीने विनाखर्चीक न्याय मिळावा; या संकल्पनेतून राष्ट्रीय लोक अदालतीचे आयेाजन करण्यात येते. जिल्‍हा न्यायालयात आज विधीसेवा प्राधीकरणाचे संकल्पगीताने लोकअदालतीला सुरवात झाली. जिल्‍हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलाणी, के. एच. ठेांबरे, जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. केतन ढाके, जिल्‍हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. दिलीप बोरसे, ॲड. दर्शन देशमुख यांच्या उपस्‍थितीत कामकाजाला सुरवात झाली. न्या. आर. जे. कटारीया, न्या. एस. जी. ठूबे, न्या. जे. जी. पवार, न्या. अक्षी जैन, न्या. डी. बी. साठे यांनी पॅनल प्रमुख म्हणून तर, ॲड. आर. टी. बाविस्कर, ॲड. मंजुळा मुंदडा, ॲड. विजय शिंदे, ॲड. कुसूम पाटिल, ॲड. संदिप पाटिल, ॲड. शैलेश पाटिल, ॲड. वैशाली बोरसे, ॲड. तोतिषा भिरुड ॲड. संजयसींग पाटिल आदींनी सहकार्य केले. 

साडेतीन हजार खटले निकाली 
जळगाव जिल्‍हा न्यायालया अतंर्गत प्रलंबीत ५४३ खटले आणि वादपुर्व प्रकरणांपैकी ३०६० इतक्या प्रकरणात तडजोडी होऊन निकाली काढण्यात आले. जिल्‍ह्‍याअंतर्गत न्यायालयांमध्ये ३ हजार ६०३ प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात येवुन १२ कोटी १ लाख ६७ हजार ३७४ इतक्या रकमेची तडजोडी अंती निकाल प्राप्त झाले. 

‘व्हॅाटस्‌अॅप’वर भरले न्यायालय 
आजच्या लोक अदालतीत चंद्रभान रतन पाटील विरुद्ध योगराज गंगाराम पाटील या (४५/२०१९) दिवाणी प्रकरणात चंद्रभान पाटील यांचेशी ॲड. दर्शन देशमुख यांनी व्हिडीओकॉलद्वत्तरे पॅनल सदस्यांशी संवाद साधला, तर समोरील पक्षकार योगराज पाटील यांच्यातर्फे ॲड. संग्राम चव्हाण उपस्थीत होते. संवाद कायम होवुन उभय पक्षामध्ये तडजोड घडवण्यात पॅनल यशस्वी झाले असून दोन्ही पक्षकाराचे संपुर्ण समाधान झाल्याने प्रकरण निकाली काढण्यात आले. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon national lok adalat whatsaap video calling