देशव्यापी बंद यशस्वीचा निर्धार; जळगावात लोक संघर्ष मोर्चा करणार निदर्शने 

देवीदास वाणी
Monday, 7 December 2020

जिल्ह्यात कडकडीत बंद पाळणार, सर्व नागरिक व्यापारी संघटना, बाजार समिती , ट्रक असोसिएशन, रिक्षा चालकाची संघटना हमाल मापडी संघटना यांना बंद सर्व पुरोगामी संघटना सहभागी होणार.

जळगाव : भारत बंदमध्ये महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच डावे पक्ष सुद्धा सहभागी होणार आहे. लोक संघर्ष मोर्चा व कामगार संघटना सयुंक्त कृती समिती (महाराष्ट्र राज्य) महाराष्ट्रभर बंद मध्ये सहभागी होऊन निदर्शने करणार आहे. जळगावमध्ये जिल्हा बंद यशस्वी करण्याचा निर्धार सोमवारी (ता.७) झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस ,लोक संघर्ष मोर्चा ,कामगार संघटनांची आघाडी, अनेक पुरोगामी संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला. 
अजिंठा विश्रामगृहात ही बैठक झाली. लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, मुकुंद सपकाळे, अभिषेक पाटील, शरद तायडे, गफार मलिक, शाम तायडे, जमील शेख, सुरेंद्र पाटील (मराठा सेवा संघ), विलास पाटील, भारत सासणे (वंचित), अमोल कोल्हे (छावा), विजय सुरवाडे (बहुजन क्रांती मोर्चा), साजिद शेख (समाजवादी पार्टी), शाळिग्राम मालकर (माळी महासंघ), विजय पवार (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष), ॲड. सचिन पाटील, सचिन धांडे, विष्णू भंगाळे, प्रा करीम सालार आदी ३० संघटना व पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. 

बैठकीत झालेले निर्णय असे 
जिल्ह्यात कडकडीत बंद पाळणार, सर्व नागरिक व्यापारी संघटना, बाजार समिती , ट्रक असोसिएशन, रिक्षा चालकाची संघटना हमाल मापडी संघटना यांना बंद सर्व पुरोगामी संघटना सहभागी होणार. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी इत्यादी पक्ष व लोक संघर्ष मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड सकाळी नऊला टॉवर चौकातून मोटार सायकल रॕली काढून बंदचे आवाहन करणार. जिल्हाधिकारी यांना संयुक्त किसान मोर्चा, महाविकास आघाडीतील सर्व पक्ष व लोक संघर्ष मोर्चा, कामगार संघटना पदाधिकारी निवेदन देणार. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon nationwide shutdown loksangharsh morcha strike tommarow