अखेर गोशाळेतील गायींना मिळाला चारा

अखेर गोशाळेतील गायींना मिळाला चारा
cows in the cowshed
cows in the cowshedcows in the cowshed

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : गायींना चारा (cows in the cowshed) नसल्याने खूप हाल होत असल्याचे चित्र पाहून व येथे उदभवलेली परीस्थिती पाहून चाराटंचाई संदर्भात मंगळवारी (ता. ११) ‘सकाळ’मध्ये ‘चाऱ्याअभावी पशुधनाच्या मरणकळा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन वडगाव लांबे (ता. चाळीसगाव) येथील वटेश्वर आश्रमातील गायींसाठी जळगाव व धुळे जिल्ह्यातील दानशुरांनी स्वखर्चाने चारा उपलब्ध करून दिला. ‘सकाळ’च्या वृत्तामुळे गायींना चारा मिळत असल्याची भावना गोसेवक रविदास महाराज यांनी व्यक्त केली. (cows in the cowshed got fodder)

कोरोना संकटकाळात पशुखाद्य तसेच चाऱ्यांचे वाढलेले भाव, गाव पातळीवर शासनाच्या न पोचलेल्या विविध योजना अशा कारणांमुळे गुरांची संख्या घटत आहे. या संदर्भात मंगळवारच्या (ता. ११) ‘सकाळ’मध्ये वस्तुनिष्ठ वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यात वडगाव लांबे येथील वटेश्वर आश्रमावरील गोसेवक रविदास महाराज यांच्याकडे लहान मोठ्या सुमारे दोनशेच्या देशी गायी आहेत. या गायींचे चाऱ्याअभावी पालनपोषण कसे करावे? याची चिंता महाराजांनी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केली होती. हे वृत्त वाचून धुळे व चाळीसगाव तालुक्यातील अनेकांचे हात सरसावले.

cows in the cowshed
पोलिसाची इस्त्रीवाल्यास पिस्तुलीने उडवण्याची धमकी

अनेकांकडून गायींना चारा

येथील गायींना चारा नसल्याचे ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. तसेच सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाले. या बातमीनंतर येथे चारा देण्याचा ओघ सुरू झाला. विशेष म्हणजे तब्बल सोळा वर्षानंतर गायींना भुईमूग पिकाचा चारा मिळाला. धुळे जिल्ह्यातील तरवाडे येथील शिवराणा ग्रुप, सुनील जमादार, अनिल महाजन, समाधान पाटील, चाळीसगाव तालुक्यातील कुंझरचे दादा गुरुजी, बी. टी. पाटील, कैलास पाटील, तळेगाव येथील श्री. चव्हाण यांच्यासह अनेक दानशूर लोकांनी येथे ज्वारी, बाजरी, मक्याचा चारा वटेश्वर येथे गोसेवक रविदास महाराज यांच्याकडे सुपूर्द केला. आश्रमातील गायींना गरजेच्यावेळी चारा उपलब्ध झाल्याने रविदास महाराज यांनी ‘सकाळ’सह गायींना चारा देणाऱ्या दात्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

चाऱ्यासाठी सरसावली खाकी..

वडगाव लांबे (ता. चाळीसगाव) येथील वटेश्वर आश्रमातील गायींचा चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. येथील गोशाळेत गायींना चारा नसल्याचे वृत्त मेहुणबारे पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी शैलेंद्र माळी यांनी 'सकाळ'मध्ये वाचले. श्री. माळी यांनी या वृत्ताची दखल घेऊन स्वखर्चाने दोन ट्रॅक्टर चारा वटेश्वर येथील गायींना गोशाळेत पोहच केला. गायींना चारा देण्यासाठी ‘खाकी’ सरसावल्याने अनेकांनी शैलेंद्र माळी यांच्या या दातृत्वाचे कौतुक केले आहे.

सध्याच्या उदभवलेल्या परिस्थितीत गोमातेला सहकार्य करणे, हे आपल्या हिंदू धर्मात अत्यंत उच्च कोटीचे पुण्यप्राप्तीचे कार्य मानले जाते. ज्यांना गायींसाठी चारा द्यायचा असेल त्यांनी या पुण्याच्या कार्यात सहभागी व्हावे. ‘सकाळ’ने हा विषय थेट लोकांपर्यंत पोचविण्याचे काम केल्याने खास करून त्यांचे शतशः आभार मानत आहे.

- रविदास महाराज, गोसेवक, वडगाव लांबे आश्रम (ता. चाळीसगाव)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com