उमवि पदवी, पदव्युत्तर ऑनलाइन परीक्षांना सुरवात; १० हजार विद्यार्थी परीक्षेला

उमवि पदवी, पदव्युत्तर ऑनलाइन परीक्षांना सुरवात; १० हजार विद्यार्थी परीक्षेला
nmu
nmunmu

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षांना मंगळवारपासून (ता.१८) सुरळीत प्रारंभ झाला. (jalgaon news university online exam start)

विद्यापीठाच्या एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी., एम.एस.डब्ल्यू., एम.ए.(एम.सी.जे.), एम.बी.ए., एम.एम.एस. (कॉम्प्युटर मॅनेजमेंट), एम.सी.ए., एम.सी.ए. इंटीग्रेटेड पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रथम सत्रास प्रवेशित नियमित विद्यार्थ्यांच्या आणि प्रथम वर्ष इंजिनियरींग सत्र १, व्दितीयवर्ष इंजिनियरींग सत्र ३, बी.फार्मसीचे सत्र १ आणि ३ आणि विद्यापीठ प्रशाळातील पदव्युत्तर वर्गांच्या सत्र १ या सर्व अभ्यासक्रमांच्या लेखी परिक्षा ऑनलाईन पध्दतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येत आहे.

nmu
कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी; पण काही केल्‍या रस्‍ते ओस पडेनात

९ हजार आठशे विद्यार्‍थ्‍यांनी दिली परीक्षा

मंगळवारी पहिल्या दिवशी ९ हजार ८४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेसाठी लॉगईन केलेल्या ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी उद्‌भवल्या त्या आय.टी. समन्वयकांमार्फत दूर करण्यात आल्यात. त्यामुळे लॉगईन झालेला कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिला नाही.

अशी झाली परीक्षा

विद्यार्थ्यांना तीन तासांचा विंडो कालावधी दिला असल्यामुळे सोयीचे झाले. पदवीस्तरावरील परीक्षेसाठी ९० मिनिटे व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी १२० मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com