आठ वर्षांपासून देताय एचआयव्हीग्रस्तांना सकस आहार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 November 2020

पचविण्याची क्षमता निर्माण व्हावी, ही गरज ओळखून डॉ. रितेश पाटलांनी हा उपक्रम सुरू केला. टप्प्याटप्प्याने या उपक्रमात समाजातील अनेक दाते जुळले आणि आठ वर्षांपासून हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे.

जळगाव : तालुक्यातील एचआयव्हीग्रस्त बालकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून डॉ. रितेश पाटील यांनी आठ वर्षांपूर्वी या बालकांना सकस आहाराच्या वाटपाचा उपक्रम सुरू केला. याअंतर्गत लायन्स क्लबतर्फे दिवाळीनिमित्त शहरातील एचआयव्हीग्रस्त बालकांना सकस आहार वाटपाचा कार्यक्रम झाला. 

नक्‍की वाचा- ‘खड्डेमुक्त शहराच्या प्रकाशमय शुभेच्छा’ मिळणार काय? 

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते मुलांना सकस आहार व दिवाळी फराळ देण्यात आला. तसेच दोन शिलाई मशिनही देण्यात आल्या. एचआयव्हीग्रस्त बालकांना उपचारासाठी ज्या औषधी, गोळ्या दिल्या जातात, त्या पचविण्याची क्षमता निर्माण व्हावी, ही गरज ओळखून डॉ. रितेश पाटलांनी हा उपक्रम सुरू केला. टप्प्याटप्प्याने या उपक्रमात समाजातील अनेक दाते जुळले आणि आठ वर्षांपासून हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे. यंदाही मान्यवरांच्या उपस्थितीत या बालकांना सकस आहाराचे पदार्थ, साहित्याचे वाटप करण्यात आले. लायन्स क्लबचे अध्यक्ष पन्नालाल वर्मा, रोहित अग्रवाल, श्री. सोनी, सौ. कांकरिया आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ. नीलिमा सेठिया, ज्योत्स्ना रायसोनी, दिलीप गांधी यांनी सहकार्य केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon ngo last eight year diet in hiv child