esakal | न्हावी शिवारात प्रौढाचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

lightning struck

न्हावी शिवारात प्रौढाचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवान्हावी ः येथे आज दुपारी दिड वाजता जोरदार वारा व वीजांच्या जोरदार पावसाने हजेरी लावली त्यात प्रौढाचा अंगावर वीज कोसळल्याने (lightning struck) जागीच मृत्यू (Death) झाला. शुक्रवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली. हमीद रूबाब तडवी 47 असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.

हेही वाचा: आई-वडीलांच्या भांडणाला मुलगा कंटाळला; आणि थेट धरणात घेतली उडी

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, हमीद तडवी हे न्हावी शिवारातील जानोरी जंगलात खारबर्डी धरणाच्या पाटचारीजवळ शुक्रवारी गुरे चराईसाठी गेल्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास तहान लागल्याने पाटचारीत पाणी पीत असतांना त्यांच्या पायाजवळ वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेल्या व्यक्तीने ओरडा-ओरड केल्याने परीसरातील शेतकरी व मजूर जमा झाले. त्यांनी तातडीने त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.

हेही वाचा: नवापूरः व्यायाम करतांना आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा मृत्यू

याप्रकरणी फैजपूर पोलीस हबीब तडवी यांच्या खबरीनुसार ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार राजेश बऱ्हाटे, श्रीकांत इंगळे करीत आहे. मयताच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परीवार आहे.

loading image
go to top