esakal | नवापूरः व्यायाम करतांना आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

नवापूरः व्यायाम करतांना आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा मृत्यू

नवापूरः व्यायाम करतांना आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा मृत्यू

sakal_logo
By
विनायक सुर्यवंशी

नवापूर: धनराट (ता. नवापूर) येथील शासकीय आश्रम शाळेत (Ashram School) दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा सकाळी व्यायाम (Exercise) करत असताना चक्कर येवून पडल्याने मृत्यू (Death) झाल्याची घटना आज घडली. त्याच्या आईवडील व नातेवाईकांना घटनेची माहिती मिळताच नवापूर उपजिल्हा रुग्णालयात (Sub-District Hospital) आक्रोश सुरू केला. घटनेची माहिती पसरताच भवरे (ता. नवापूर) गावात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा: धुळे मनपातील वादग्रस्त वॉटरग्रेस अखेर ‘बाद’


धनराट ( ता. नवापूर ) येथील शासकीय आश्रम शाळेत दहावीत शिकत असलेला विद्यार्थी भाऊ कर्जा गावीत (वय १६ राहणार भवरे, ता नवापूर) हा आज सकाळी सहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे रनिंग करायला गेला, रनिंग करत असतांना चक्कर येऊन पडला. आश्रम शाळेचे कामाठी मगन वसावे यांनी १०८ रुग्णवाहीकेला बोलावून विद्यार्थी भाऊ कर्जा गावीत यास नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदिप गावीत यांनी सदर विद्यार्थी याला तपासनी करुन मयत घोषित केले.विद्यार्थीचे शवविच्छेदन करण्यात आले असुन घटनेचा तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ, हवालदार कैलास तावडे, गणेश बच्छे, नरेंद्र नाईक, नितिन नाईक करत आहे.

हेही वाचा: ‘वसाका’ पुन्हा बहरेल का? राजकीय इच्छाशक्तीचा अभाव..

भवरे गावावर शोककळा

या घटनेमूळे भवरे गावात शोककळा पसरली असून नवापूर उपजिल्हा रुग्णालयात नातेवाइकांनी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात आईवडिलांनी आक्रोश केला होता. यावेळी भवरे गावाचे माजी जि.प सदस्य रतनजी गावीत सह ग्रामस्थ उपस्थित होते.

loading image
go to top