esakal | आई-वडीलांच्या भांडणाला मुलगा कंटाळला; आणि थेट धरणात घेतली उडी
sakal

बोलून बातमी शोधा

Suicide

आई-वडीलांच्या भांडणाला मुलगा कंटाळला; आणि थेट धरणात घेतली उडी

sakal_logo
By
भरत बागुल

पिंपळनेर : येथील हितेश तमखाने 18 वर्षीय या तरूणाने घरात होणाऱ्या वारंवार होणाऱ्या भांडणास कंटाळून लाटीपाडा धरणाच्या (Latipada Dam) जलाशयात उजव्या गेटवरून उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना ता. 30 सप्टेंबर रोजी उघडकीस आली आहे. उजव्या कालव्याचे गेट बंद करून अखेरचा प्रयत्न करतांना टीमला यश मिळाले. गेटमध्येच मृतदेह अडकून पडल्याने गेट बंद करतांना मृतदेह पाटचारीतून पाण्याच्या प्रवाहात वाहून आल्याने सापडले. याघटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हाधिकारी जलद शर्मा(Collector Jalad Sharma) , जिल्हा पोलीस अधिक्षक प्रवीण पाटील(District Superintendent of Police Praveen Patil) , अपर तहसीलदार विनायक थवील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे हे घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा: पायपीट करीत जिल्हाधिकाऱ्यांनी गाठले कजाळा गाव


घरात आई-वडिल यांची भांडण वारंवार होत असलेल्याच्या रागाच्या भरात परवा ता. 29 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजेपासून हितेश दत्तात्रय तमखाने हा तरूण घरातून मोटरसायकल क्र. (एम एच. 18 - 5118) घेऊन निघून गेला. रात्री उशिरा पर्यंत आला नाही म्हणून त्याचे वडील दत्तात्रय रामा तमखाने यांनी मुलाच्या मित्रांना ही बाब सांगितली. मित्रांनी रात्री शोध घेतला असता तो सापडला नाही. कुठे गेला याबाबत कुणाला काही न सांगितल्याने शंका बळावली म्हणून अखेर धरणावर गेल्याची शक्यता वर्तवली. 30 सप्टेंबर गुरूवार रोजी पहाटे सहा वाजता लाटीपाडा धरणावर शोधण्यासाठी मित्र आले. त्याठिकाणी उजव्या कालव्याच्या गेटवरच्या भिंतीवर मोटारसायकल तर गेटवर मोबाईल संच व बोटातली सोन्याची अंगठी आढळून आली. हे सर्व साहित्य मुलगा हितेशचे असल्याचे निश्चित झाल्याने यामुळे हितेश तमखाने या तरूणाने धरणाच्या उजव्या गेटवरून पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त झाला.

अखेर सापडला मृतदेह..

या घटनेची वार्ता गावात पसरताच लोकांनी तिथे गर्दी केली होती. शोधकार्यासाठी लागलीच मालेगाव येथील दहा जणांची खाजगी. आपत्कालीन व्यवस्थापन टीमला पाचारण करण्यात आले. रात्री नऊ वाजेपर्यंत ही टीम धरणाच्या पात्रात शोध घेतला. सलीम शेख यांच्या पिक अप वाहनात जनरेटर आणून प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली होती. पाच ते सहा तास शोध कार्य सुरू होते. मात्र काहीच हाती लागले नाही म्हणून उजव्या कालव्याचे गेट बंद करून अखेरचा प्रयत्न केला असता पाण्यातील लोखंडी गेटमध्ये मृतदेह अडकून पडल्याने धडापासून शीर वेगळे होऊन तुटलेले धड व शिर कालव्याच्या पाटचारीतून वाहून आल्यामुळे सापडले. लाईट फोकस व्यवस्था केल्याने शोधकार्य सुलभ झाले. भोई गल्लीतली तरूणांनी व गावातील तरूणांनी यावेळी सहकार्य केले.

हेही वाचा: नवापूरः व्यायाम करतांना आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा मृत्यू

फळ विक्रीचा करत होता व्यवसाय

हितेश तमखाने हा तरूण बारावी उत्तीर्ण होऊन त्याने सीईटी परीक्षा दिली होती. त्यांचा मूळ व्यवसाय फळे विक्रीचा असल्याने तो फळ दुकानावरही बसत असे. सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर टीमला रात्री उशिरा यश मिळाले. अखेर मृतदेह गेटमधून बाहेर पाटचारीतून वाहून आल्याने आढळून आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे व पोलीस पथक या ठिकाणी तळ ठोकून होते. रात्री मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. आज शव विच्छेदन करून मृतदेह परिवाराच्या ताब्यात देवून अंतिम संस्कार करण्यात आले. अतिशय दुर्दैवी घटना घडल्याने शहरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

loading image
go to top