esakal | निसर्ग' वादळाचा परिणाम...जिल्ह्यात सर्वत्र पाऊस ! 
sakal

बोलून बातमी शोधा

निसर्ग' वादळाचा परिणाम...जिल्ह्यात सर्वत्र पाऊस ! 

सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून बऱ्यापैकी दिलासा मिळाला.

निसर्ग' वादळाचा परिणाम...जिल्ह्यात सर्वत्र पाऊस ! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव ः निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली. दिवसभर सरीवर सरी कोसळत होत्या. रात्री आठनंतर काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान, प्रशासनाने चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमी सावधानतेचा इशारा दिला होता. मात्र, दिवसभर केवळ पाऊस झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. आजच्या पावसाने पूर्वहंगामी कपाशीच्या लागवडीला फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. 

नक्की वाचा : संशयित रुग्णांचे "सॅम्पल' गहाळ...अन्‌ आरोग्य मंत्री संतप्त ! 

केरळमध्ये मॉन्सून दाखल झाल्यानंतर कोकण, मुंबईत ‘निसर्ग' चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्‍यता होती. अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ तयार झालेल्या हवेचा कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात होण्याची चिन्हे आहेत. यामुळे कोकण किनारपट्टीसह मुंबई, दक्षिण गुजरातला चक्रीवादळाचा तडाखा बसून, जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार मंगळवारी रात्री चाळीसगाव परिसरात जोरात पाऊस झाला. आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू होता. 

भुसावळ परिसरात नाल्यांना पूर 
भुसावळ : भुसावळसह यावल, रावेर, जामनेर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु होती. परिसरात काही ठिकाणी नाले भरून वाहू लागले. भुसावळला जाम मोहल्ला भागातील नाला ओसांडून वाहू लागल्याने नाल्याचे पाणी वस्त्यांमध्ये घुसले. बागायती कपाशीला याचा फायदा होणार आहे. पावसामुळे वीट भट्ट्याचे नुकसान झाले आहे. यावल शहरासह तालुक्यात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. जामनेर तालुक्यात दुपारी पावसाला सुरवात झाली. शेतात साठवून ठेवलेला मालाचे नुकसान झाले. रावेर तालुक्यात आज मंडळनिहाय ८.७१ मिमी पाऊस झाला. 

आर्वजून वाचा  : साहेब... आमचा तर फुटबॉल झाला होता ! 
 

तापी, गिरणा परिसरात रिपरिप 
चाळीसगाव : गिरणा परिसरातील चाळीसगाव, भडगाव व पाचोरा तालुक्‍यासह तापी, बोरी, अंजनी परिसरातील चोपडा, अमळनेर, एरंडोल, धरणगाव व पारोळा आज कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. जून महिना सुरू होताच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची लगबग आज बाजारपेठेत दिसून आली. कृषी केंद्रांवर बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची एकच गर्दी झाली होती. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून बऱ्यापैकी दिलासा मिळाला. चाळीसगाव शहरासह परिसरात झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. पाचोरा भडगाव तालुक्यात पावसाची दिवसभर रिपरिप सुरू होती. अमळनेर परिसरात रात्री आठनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. 

क्‍लिक कराः महाजनांचे सेवेकरी प्रशासनातून हटवा.."एनएसयूआय'चे टोपेंना निवेदन ! 

चारा भिजला 
जिल्ह्यात गेल्या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे जलपातळी वाढल्याने रब्बीसह उन्हाळी हंगामी चांगला आला. मात्र, मजुर टंचाईमुळे शेतातील पीक काढण्यास अडचणी येत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा चारा अद्यापही शेतातच आहे. आजच्या पावसाने चारा भिजला असून, मशागतीचे कामेही थांबली. पावसाने उघडीप दिल्यानंतर पुन्हा या कामांना वेग येईल. 

loading image