esakal | उमविच्या विविध शाखांच्या परीक्षांचे निकाल जाहीर !
sakal

बोलून बातमी शोधा

North Maharashtra University

उमविच्या विविध शाखांच्या परीक्षांचे निकाल जाहीर !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये घेतलेल्या हिवाळी परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षांना ७ लाख ३४ हजार ०२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यांनी ४ हजार ४८० विषयांच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने दिल्या. या सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने सुरळित पार पडल्या.

हेही वाचा: नो टेंशन.. लॉकडाऊनमध्ये बँकेतील पैसेही मिळणार घरपोच

या परीक्षा झाल्या

विविध विद्याशाखा व अभ्यासक्रमाच्या हिवाळी परीक्षा माहे ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर २०२० च्या तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या नियमित व प्रथम वर्षाच्या बॅकलॉग विषयांच्या परीक्षा आणि दोन वर्षीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षासोबत प्रथम वर्षाच्या बॅकलॉगसह परीक्षा जानेवारी व फेब्रुवारीत घेण्यात आल्या. २ ते १७ मार्च या कालावधीत पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या सत्र-१ च्या नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आल्या होत्या. या अभ्यासक्रमाच्या प्रात्याक्षिक परीक्षा देखील दि.३१ मार्च २०२१ पावेतो ऑनलाईन माध्यमातून आयोजित करण्यात आल्या होत्या.

हेही वाचा: खानदेशात यंदा साडे बारा लाख क्विंटल साखरचे उत्पादन !

या परीक्षांचे निकाल जाहीर

या परीक्षांपैकी प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी बी व्होक, बीएसडब्ल्यू, बीएबीसीजे, डीपीए, व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या सर्व वर्गाच्या पदवी आणि पदव्युत्तर, एमए, एमकॉम, एमएसडब्ल्यू, एमए एमसीजे, शिक्षणशास्त्र विद्याशाखेतंर्गत सर्व अभ्यासक्रम, विद्यापीठातील प्रशाळा व विभागांमधील सर्व अभ्यासक्रम, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे एफई, एसई, टीई आणि बीई, औषधीनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या सर्व वर्गाचे, बी टेक कॉस्मेटीक इत्यादी परीक्षांचे निकालही तत्काळ जाहीर करण्यात आलेले आहेत.

संपादन- भूषण श्रीखंडे