जळगाव जिल्ह्यात कोरोना मुक्त होणाऱयांचा आकडा पन्नास हजार पार

भूषण श्रीखंडे
Saturday, 24 October 2020

जिल्ह्या‍त शनिवारी १७८ रुग्ण एकूण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या ५२ हजार ६९३ झाली आहे, तर बरे होऊन घरी गेलेल्‍या संख्या ५० हजार ७२ वर पोचली आहे.

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता महिन्याभरापासून दीडशेच्या आत पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत होते. परंतू आज (ता.२४) १७८ नवे रुग्णाची संख्या आल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. तर २५६ रुग्ण बरे होऊन आज घरी गेले असून दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
 
सलग चार आठवड्यांपासून जिल्ह्या‍तील कोरोनाचा उद्रेक कमी झाला आहे. रुग्णसंख्या कमी आढळून येत असून, बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण आज (ता. २४) शनिवारी रुग्णसंख्या वाढली. जिल्ह्या‍त शनिवारी १७८ रुग्ण एकूण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या ५२ हजार ६९३ झाली आहे, तर बरे होऊन घरी गेलेल्‍या संख्या ५० हजार ७२ वर पोचली आहे. तर सलग काही दिवसापासून मृत्यूची संख्या दोन येत कोरोनामुळे दोन जणांचा मृत्‍यू झाला. 

मुक्ताईनगरात रुग्ण वाढले 
सुरवातीला जळगाव शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते. मात्र, जळगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, महिनाभरापासून जामनेर शहरात कोरोना रुग्ण वाढले. त्यात दोन आठवड्यापूर्वी मुक्ताईनगरात १३९ जणांचे कोरोना अहवाल पॉझेटिव्ह आले होते. त्यानंतर आज पून्हा तीस रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. 

असे आढळले रुग्ण 

जळगाव शहर २६, जळगाव ग्रामीण ४, भुसावळ ११, अमळनेर पाच, चोपडा ५, भडगाव १, यावल पाच, एरंडोल ५, जामनेर ४०, रावेर १४, पारोळा ३, चाळीसगाव ७, मुक्ताईनगर ३०, इतर जिल्ह्तील एक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon number of corona patients reached fifty thousand