esakal | सिनेस्‍टाईल...जेल तोडण्यासाठी एक कोटीची डील; ठरल्‍याप्रमाणे झालेही पण
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon jail

नऊ महिने होऊनही जामीन मिळत नाही, म्हणून मगरेच्या मार्गदर्शनात जेलची सुरक्षा व्यवस्था भेदून पळून जाण्याच्या प्लॅनवर कामाला सुरवात झाली. अशातच सुशील मगरेचा साथीदार आणि पुणे दरेाड्यातील संशयित अमित ऊर्फ नितेश सुदर्शन चौधरी हा जामिनावर बाहेर पडल्यावर त्याने मगरेला जेलच्या भिंतीवरुन मागेल ते, पुरवल्याने कैद्यांवर त्याची छाप पडली होती.

सिनेस्‍टाईल...जेल तोडण्यासाठी एक कोटीची डील; ठरल्‍याप्रमाणे झालेही पण

sakal_logo
By
रईस शेख

जळगाव : जिल्‍हा कारागृहाच्या बॅरेकमध्ये असताना बडतर्फ पोलिस कर्मचारी सुशील अशोक मगरे याने आपल्याकडे एक कोटी रुपयांचे सोने आहे. ते मोडून प्रत्येकाच्या वाट्याला १० लाख रुपये येतील, असे आमिष दाखविल्यानंतर जेल तोडून पळून जाण्याच्या ‘प्लॅन’वर काम सुरू झाले. अखेर २५ जुलैला आतील दोघे कैदी व बाहेरील टोळक्यांच्या मदतीने जेल तोडून तिघे फुर्रर्र झाल्याचे अटकेतील संशयितांनी तपासात सांगितले. 

सुशील अशोक मगरे ज्या बॅरेक मध्ये होता, त्याच बॅरेकमध्ये आठ दिवसांपूर्वीच सागर संजय पाटील, गौरव विजय पाटील हे दोघेही आलेले होते. नवख्या गुन्हेगारांना कारागृहातूनच गुन्हेगारी विश्वाचे ज्ञान मिळते.. जेलची पदवी घेउन बाहेर पडल्यावर हे गुन्हेगार अधिकच कठोर होतात, हा आजवरचा अनुभव आहे. 

सागर, गौरवला आकर्षण 
बॅरेकमध्ये असलेल्या ४० इतर कैद्यांना सोडून सागर व गौरव यांना सुशील मगरेचे आकर्षण होतेच. नऊ महिने सुशील मगरे या गुन्हेगारीतील कुलगुरू ठरलेल्या अट्टल गुन्हेगाराचे पोलिसी मार्गदर्शन बॅरेक मधील संशयितांना आणि जेलच्या इतर गुन्हेगारांना मिळत होते. 

असा सुरु झाला प्लॅन 
नऊ महिने होऊनही जामीन मिळत नाही, म्हणून मगरेच्या मार्गदर्शनात जेलची सुरक्षा व्यवस्था भेदून पळून जाण्याच्या प्लॅनवर कामाला सुरवात झाली. अशातच सुशील मगरेचा साथीदार आणि पुणे दरेाड्यातील संशयित अमित ऊर्फ नितेश सुदर्शन चौधरी हा जामिनावर बाहेर पडल्यावर त्याने मगरेला जेलच्या भिंतीवरुन मागेल ते, पुरवल्याने कैद्यांवर त्याची छाप पडली होती. त्याचाच फायदा घेत पैसा आणि गुन्हेगारी विश्वात स्थापित करण्याचा प्लॅन या नवख्या गुन्हेगारांच्या भेज्यात उतरवण्यात मगरे यशस्वी ठरला. 

एक कोटीचे नुसते सोनेच! 
अटकेतील सागर संजय पाटील, गौरव विजय पाटील, जगदीश पाटील यांनी पोलिस केाठडीत वेगळीच माहिती उघड केली. मगरेच्या सांगण्यानुसार त्याने पुणे दरोड्यातील खरा मुद्देमाल पोलिसांना दिलाच नाही.. जो जप्त झाला तो सर्व नकली होता. ‘असली माल तो, अपने पास है..’ एक कोटी रुपयांचे सेाने आपल्याकडे आहे. जेलमधून बाहेर निघण्याचा प्लॅन सक्सेस झालाच तर.. आपसात ते सोनं आपण वाटून घेऊ. प्रत्येकाच्या वाटेला १० लाखांचा माल येईल, असे आमिष त्याने दाखवल्याचे अटकेतील संशयित आता सांगताय. 

‘फिल्मीभाई’चे स्वप्न भंगले 
गुन्हेगारीचा मास्तर मगरे याने गाडून ठेवलेल्या एक कोटीच्या सोन्याचे जाळे टाकले. त्यात अडकल्यावर प्रत्येकाच्या वाट्याला १० लाख आल्यावर मस्त मुंबईत हवा तो धंदा सेटल करुन मिळेल.. अन्‌ मुंबईच्या भाईगिरीत जम बसला तर..’ असे स्वप्नरंजन हे संशयित रंगवू लागले होते. अखेरीस त्यांना अटक झाली व स्वप्नंभग झाला. जेल तेाडून पळाल्यापासून दोन-दोन दिवस खायला काही नव्हते.. उपाशीच भटकत होतो असेही एकाने सांगितले. 
 
जळगाव जेलला नापसंती 
जगदीश पाटील, नंतर सागर, नागेश पिंगळे, अमित चौधरी आणि गौरव यांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांची जिल्‍हा कारागृहात रवानगी झाली. ‘साहेब, आम्हाला येथूनच नाशिक किंवा इतर कारागृहात पाठवून द्या’ अशी विनंती या टोळीने केली आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image