जळगावचे प्रस्तावित पोलिस प्रशिक्षण केंद्र नगरला 

police training center
police training center

जळगाव : भाजपनेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे राज्याचे महसूल मंत्री असताना त्यांनी जळगाव जिल्ह्यात हतनूर, वरणगाव येथे राज्य राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण केंद्र मंजूर केले होते. मात्र, आता ते अहमदनगर जिल्ह्यात हलविण्यात आले आहे. त्याबाबतचा अध्यादेश आज जारी करण्यात आला आहे. 
 

या प्रकल्पांचा होता समावेश 
त्याअंतर्गत केळी टिश्‍यूकल्चर प्रकल्प, हतनूर येथे मत्स्य प्रकल्प, मुक्ताईनगर येथे कृषी महाविद्यालय आणि जळगाव येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय, चाळीसगावात लिंबूवर्गीय संशोधन केंद्र यासह वरणगाव येथे राज्य राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण केंद्र मंजूर करून आणले होते. 

मंत्रिपद गेले अन्‌.. 
खडसे यांचे मंत्रिपद गेल्यानंतर जिल्ह्यातील या प्रकल्पांबाबत कोणीही पाठपुरावा केला नाही. त्यामुळे मुक्ताईनगर येथील कृषी महाविद्यालय वगळता एकही प्रकल्प सुरू झाला नाही. उलट जिल्ह्यातील प्रकल्प दुसऱ्या जिल्ह्यात हलविण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील हतनूर (वरणगाव) येथे राज्य राखीव पोलिस बल गट 19 स्थापन करण्यास मान्यता 13 सप्टेंबरला देण्यात आली होती. त्यासाठी वरणगाव येथे जागाही निश्‍चित करण्यात येऊन निधीही मंजूर करण्यात आला होता. मात्र, खडसे यांचे मंत्रिपद गेल्यानंतर याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. त्यानंतर 4 मार्च 2020 रोजी अप्पर पोलिस महासंचालकांनी नवीन अध्यादेश काढून वरणगाव येथील हे प्रशिक्षण केंद्र अहमदनगर येथील कुडसगाव येथील शासकीय जागेवर निर्माण करण्याची विनंती केली. त्यानुसार शासनाने आज अध्यादेश जारी करून हतनूर (वरणगाव) येथे मंजूर झालेले पोलिस प्रशिक्षण केंद्र कुडसगाव (ता. जामखेड, जि. अहमदनगर) येथे हलविण्यास मंजुरी देऊन मंजूर पदासह आवर्ती व अनावर्ती खर्चासह मान्यता दिली आहे. गृह विभागाचे कार्यासन अधिकारी दिनेश सस्ते यांनी हे आदेश जारी केले आहेत. या अध्यादेशामुळे खडसे यांनी जळगाव जिल्ह्यासाठी मंजूर करून आणलेल्या प्रकल्पातील आणखी एक प्रकल्प जिल्ह्यातून पळविला गेला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com