‘टपाल’ विभागाच्‍या जीडीएस पोस्‍टमन, कर्मचाऱ्यांनी अशी केली करामत

post
post

जळगाव : कोरोना आजारामुळे सर्वत्र भीतीचे सावट असताना व लॉकडाउन पूर्णपणे उठला नसतानादेखील या कठीण काळात टपाल विभागाने आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टिमच्या माध्यमातून गेल्या महिनाभरात १४ हजार ९०३ व्यवहार करून तीन कोटी ४२ लाख इतकी रक्कम ग्राहकांना वितरित करण्याची कामगिरी केली आहे. 
डाक विभागाच्या जीडीएस पोस्टमन तथा काउंटरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे. संपूर्ण देशात कडक लॉकडाउन असतानाही डाक विभाग अत्यावश्यक सेवा प्रदाता या प्रवर्गात असल्याने ग्राहकांच्या हितासाठी आपली सेवा अविरत सुरू ठेवलेली होती. सुरवातीला फक्त अत्यावश्यक सेवा देत गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून डाक विभागाने आपल्या संपूर्ण सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. या कामासाठी विभागास जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांचे अमूल्य सहकार्य लाभले आहे, अशी माहिती जळगाव विभागाचे डाक अधीक्षक पी. बी. सेलुकर यांनी दिली. 
 
अशी आहे सेवा 
त्यातीलच एक महत्त्वाची सेवा म्हणजे AePS ही आहे. या सेवेत ग्राहकांना त्यांच्या आधार क्रमांक लिंक असलेल्या बँक खात्यातून सहज पैसे काढता येतात. त्यासाठी फक्त आपला आधार क्रमांक, बोटांचे ठसे आणि मोबाईल असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, ही सेवा पूर्णपणे ऑनलाइन असून, पैसे काढण्यासाठी कुठलीही पावती भरण्याची आवश्यकता नाही. ग्राहक पोस्टमनच्या माध्यमातून या सेवेचा घरपोच लाभ घेऊ शकतात. त्यासाठी ग्राहक मोबाईलमध्ये postinfo या ॲप्लिकेशनमार्फत अथवा www.indiapost.gov.in या संकेतस्थळावरून घरपोच सेवेसाठी विनंती करू शकतात. वयोवृद्ध ग्राहक, निवृत्तांना ही सेवा अत्यंत उपयोगी आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com