खरीपपूर्व कापूस लागवडीची तयारी पूर्ण..पण उत्पादन घटण्याची भीती ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cottan

खरीपपूर्व कापूस लागवडीची तयारी पूर्ण..पण उत्पादन घटण्याची भीती !

गणपूर (ता चोपडा): शासनाने (government) बोंड अळीचे कारण दाखवत खरीप पूर्व (उन्हाळी) (Summer) कपाशीची (cottan) लागवड एक जून पासून करण्याचे व बियाणे (seed) वाटपाचे नियोजन केले असले तरी उशिरा लागवडीतून उत्पादन कमी येत असल्याचे अनुभव असल्याने शेतकऱ्यांनी लागवड पूर्व तयारी केली असून परराज्यातून किंवा घरगुती बियाणे वापरून खानदेशात (kahandesh) तुरळक प्रमाणात का होईना लागवड 15 मे पासून होण्याची चिन्हे आहेत.

(preparations cotton cultivation complete fear declining production)

हेही वाचा: संचारबंदीमुळे माहेरवाशिणींचा हिरमोड; यंदाही महिलांची अक्षयतृतीया सासरीच!

साधारणपणे 18 ते 31 दरम्यान लागवड केलेल्या बीटी वानांपासून बऱ्यापैकी उत्पादन येते असे अनुभव उत्पादकांना आहेत, त्यामुळे खानदेशात पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात खरीपपूर्व लागवड 'मे' च्या दुसऱ्या पंधरवड्यात सुरू होते. गेल्या वर्षी पावसाच्या पाण्यावर लावलेल्या कपाशी पासून एकरी 3 ते 4 क्विंटल उत्पादन आल्याने. शेतकऱ्यांचा कल 'मे' च्या लागवडीकडे वाढला आहे.

बियाणे काळाबाजार

खानदेशात साधारणपणे पंधरा वर्षांपूर्वी एवढी उन्हाळी लागवड नव्हती. पण बीटी वाणानंतर ती वाढली. खानदेशात खरीप लागवड योग्य असणाऱ्या सुमारे साडे चौदा लाख हेक्टर क्षेत्रापैकी निम्मे पेक्षा अधिक क्षेत्रात कपाशी ची लागवड होते. त्यात अधिक क्षेत्र जळगाव जिल्ह्याचे आहे. बियाणे उशिरा मिळेल आणि लागवड 'जून' मध्ये होईल असे होत नाही. उलट बियान्याचा काळाबाजार आणि जवळच्या राज्यातून बियाणे आणून शेतकरी लागवड करतात असे अनुभव आहेत.

हेही वाचा: पाटणादेवी जंगलातील थरार; वाळू चोरट्याने चालविले वन कर्मचाऱ्यावर ट्रॅक्टर, सुदैवाने पायावर निभावले

खासदारांनी केली मागणी

जळगाव चे खासदार उन्मेष पाटील यांनी बियाणे 15 मे ला मिळावे अशी मागणी केली आहे. सद्य स्थितीत बऱ्याच भागात सरी पाडणे ,सऱ्या पाण्याने ओलित करण्याची कामे सुरू असून साधारणपणे 18 मे नंतर लागवड सुरू होईल अशी चिन्हे आहेत.

15 मे ते 31 मे दरम्यान लागवड केलेल्या बीटी कपाशीचे इतर हंगामापेक्षा अधिक उत्पादन येते असे. अनुभव असल्याने शेतकरी या काळात लागवड करतात. असा आजपर्यंतचा अनुभव आहे. - रवींद्र लहू पाटील, कापूस उत्पादक शेतकरी, गणपूर.

(preparations cotton cultivation complete fear declining production)

Web Title: Marathi News Jalgaon Preparations Cotton Cultivation Complete Fear Declining

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Farmerjalgaon news
go to top