जातीवाचक गावांसह वस्त्यांची नावे तातडीने बदला- जिल्हाधिकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Collector Abhijit Raut

जातीवाचक गावांसह वस्त्यांची नावे तातडीने बदला- जिल्हाधिकारीजळगाव ः जिल्ह्यातील गावे (Villages), वस्ती आणि रस्त्यांची (Roads) नावे जातीवाचक असल्यास ती बदलून अशी सर्व गावे, वस्ती आणि रस्त्यांना महापुरुष व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याची कार्यवाही तातडीने करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी आज दिले.

हेही वाचा: आता तृतीयपंथीयांनी मिळणार ओळखपत्र; पोर्टल सुरू!सामाजिक न्याय विभागाने जातीवाचक नावे बदलण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर गठित जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदी बैठकीस उपस्थित होते.

हेही वाचा: गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल


जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृध्दीगंत होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील गावे, वस्ती आणि रस्त्यांची नावे जाती वाचक असल्यास ती बदलावीत. त्याऐवजी थोर महापुरुषांची नावे किंवा लोकशाही मूल्ये वृध्दिंगत होतील, अशी नावे द्यावीत. त्यासाठी संबंधित यंत्रणांनी समाजकल्याण विभागाला सहकार्य करावे.

हेही वाचा: एफआरपी न मिळू देण्याचा पवारांचा कुटिल डाव-सदाभाऊ खोत


३३ वस्त्यांची जातीवाचक नावे बदलली
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ३३ जातीवाचक वस्त्यांची नावे बदलण्यात आली असून त्यांना महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत, अशी माहिती समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. पाटील यांनी बैठकीत दिली. त्यापैकी भुसावळ तालुका-३, भडगाव-१, एरंडोल-३, पाचोरा-७, रावेर-१, जामनेर-१०, अमळनेर-२ या वस्त्यांची माहिती प्राप्त झाली आहे. तर यावल, बोदवड, चाळीसगांव, चोपडा, धरणगांव, जळगांव, मुक्ताईनगर, पारोळा या तालुक्यांचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

Web Title: Marathi News Jalgaon Promptly Change Names Of Settlements Including Caste Villages

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..