esakal | पुणे-मुंबईसह जळगावच्या बेरोजगार तरुणांची २९ लाखांची फसवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे-मुंबईसह जळगावच्या बेरोजगार तरुणांची २९ लाखांची फसवणूक

पुणे-मुंबईसह जळगावच्या बेरोजगार तरुणांची २९ लाखांची फसवणूक

sakal_logo
By
टीम ई सकाळ


जळगाव : बँकेत नोकरी (Bank Job) लावून देण्याचे आमिष दाखवून जळगावच्या दोघांसह पुणे (Pune), मुंबई (Mumbai) व भुसावळ (Bhusawal) येथील पाच उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांची (Highly educated unemployed youth) तब्बल २९ लाख ८४ हजार रुपयांची फसवणूक (Cheating) करण्यात आली. अंकित भालेराव याने वैभव राणे असे बनावट धारण करून संबंधितांची फसवणूक केली. या प्रकरणी अंकितसह त्याची आई रत्नमाला भालेराव (वय ६२), बहीण स्वाती भालेराव (३०, तिघे रा. बौद्धवाडा, मुक्ताईनगर) यांना अटक झाली. तिघांना न्यायालयात (court) हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस ( Ramandnager Police station) कोठडी सुनावली.

(pune mumbai bhusawal educated unemployed youth cheting arrest by police)

हेही वाचा: रेमडेसिव्हिर उपचारातून बाद मात्र वापर सुरूच!

अमोल प्रदीप चौधरी (३५, रा. वसई) याला नोकरी देण्याचे प्रलोभन देऊन सुमारे चार लाख ६८ हजारांची फसवणूक केली. सोबत हेमंत सुभाष भंगाळे (३३, रा. नेहरूनगर, मोहाडी रोड, जळगाव) या हातगाडी व्यवसायिकाला चार लाखांत गंडविले. पूर्वा ललित पोतदार (३२, रा. देहू रोड, पुणे) यांना सात लाख ३० हजारांत, देवेंद्र सुरेश भारंबे (३६, रा. शिवकॉलनी भुसावळ) यांना दोन लाख ४० हजारांत, नितीन प्रभाकर सपके (४५, रा. आनंदनगर मोहाडी रोड, जळगाव) यांना १२ लाख ६० हजार रुपये अशी एकूण २९ लाख ८४ हजार रुपयांची फसवणूक केली. रामानंदनगर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक बिरारी तपास करीत आहेत.

हेही वाचा: पितृछत्राला झाली पारखी,पण गुणवत्ता राखली;पल्लवीची करुण कहाणी

खोटे नाव केले धारण
अंकित भालेराव याने आपले नाव ‘वैभव राणे’ असल्याचे सांगत ही फसवणूक केली. यात त्याची बहीण स्वाती भालेराव आणि आई रत्नमाला भालेराव यांचाही सहभाग असल्याचे आढळून आले.

हेही वाचा: जनजीवन मिशनअंतर्गत राज्यातील प्रत्येक घराघरापर्यंत पाणी!

असा अडकला जाळ्यात
वैभव राणे (अंकित भालेराव) याने १६ जुलैला नोकरीच्या प्रोसेसकामी जळगावला जाऊ, असे सांगून अमोल यांना बोलावले. तेथून राणे याच्या कारने (एमएच १५, जीएक्स ६५९९) सकाळी साडेनऊला जळगावला आले. एका हॉटेलबाहेर. तू इथेच थांब व माझी कार तुझ्याजवळच राहू दे, असे सांगून वैभव राणे तेथून निसटला. अमोल यांना रामानंदनगर पोलिस ठाण्यातून फोन आला, कार चोरली आहे का? तक्रार आली आहे, असे सांगितल्याने अमोल यांनी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांना खरा प्रकार सांगितला. त्यांच्याकडील कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. एकामागून एक धाग्यांचा उलगडा करून संशयितांनी फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.

loading image