
हिरापुर (मध्यप्रदेश) येथील धर्मेंद्र महेश पाटिल (वय ३६) हे दोन दिवसांपासून चुलत भावाच्या लग्नासाठी जळगावात आले होते. लग्नसोहळा अटोपून शनिवार (ता. 12) रामेश्वर कॉलनीतील नातेवाईकांची गाठभेट घेवून मध्यप्रदेशाकडे रवाना झाले होते.
जळगाव : लग्नासाठी आलेल्या मध्यप्रदेशातील नातेवाईकांची अडीच लाखांचे दागिने असलेली बॅग कार मधुन गहाळ झाली होती. बॅगेत इतरही मैाल्यवान वस्तु होत्या. धावत्या कार मधुन पडलेली हि बॅग उचलून चंदनसींग चव्हाण व मुलगा यश यांनी उचलून पोलिसांच्या स्वाधीन केली. पोलिस ठाण्यात बॅग चोरीची तक्रार दाखल होत असतांनाच बॅग जणू स्वतःच चालून पेालिस ठाण्यात आल्याने पाटिल कुटूंबीयांना हायसे वाटले.
हिरापुर (मध्यप्रदेश) येथील धर्मेंद्र महेश पाटिल (वय ३६) हे दोन दिवसांपासून चुलत भावाच्या लग्नासाठी जळगावात आले होते. लग्नसोहळा अटोपून शनिवार (ता. 12) रामेश्वर कॉलनीतील नातेवाईकांची गाठभेट घेवून मध्यप्रदेशाकडे रवाना झाले होते. रामेश्वर कॉलनीतील आदित्य चौकात धावत्या कारच्या डीक्कीतून एक बॅग खाली पडली. मात्र, पाटील कुटूंबीय आणखी सामान घेण्यासाठी एमआयडीसीतील महालक्ष्मी दालमीलवर आले. येथे दोन बॅग ठेवतांना गाडीतील दागिने असलेली बॅग गहाळ असल्याचे आढळून आले. शोधा- शोध करुनही सापडत नसल्याने धर्मेंद्र पाटील यांनी पेालिस ठाणे गाठले. एमआयडीसी पेालिस ठाण्यात बॅग गहाळ झाल्याची तक्रार सांगण्यात आली.
सीसीटीव्हीत देाघे कैद
रामेश्वर कॉलनी ते एमआयडीसी पर्यंतच्या रस्त्यावरील सीसीटीव्हीची तपासणी केली असता, धावत्या कारमधून आदित्य चौकात बॅग पडल्याचे व ती कोणीतरी उचलून नेल्याचे दिसून आले. चंदनसिंग व यश चव्हाण या बाप लेकाने बॅग उचलून ओळखीचे पेालिस सुधीर साळवे, आसीम तडवी यांना बोलावून घेतले. मात्र, बॅगसह तुम्हाला ही यावे लागेल असे सांगत पेालिस त्यांना पेालिस ठाण्यात घेवून आले.
बाप-लेकाचे आभार व कौतुक
दागिन्यांची बॅग गहाळ झाल्याने सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसींग पाटिल यांच्यासह गुन्हेशोध पथकाने तपासचक्रे गतीमान केली. सीसीटीव्ही फुटेज विवीधग्रृपवर टाकण्यात आले. इतक्यात चंदनसीग चव्हाण मुलगा यश असे दोघेही बॅग घेवून पेालिस ठाण्यात धडकले. निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या दालनात बॅग उघडून दागिने व इतर मुद्देमालाची खात्री करण्यात येवुन धर्मेंद्र पाटिल यांच्या स्वाधीन करण्यात आली. पाटिल कुटूंबीयांनी चंदनसींग व त्यांचा मुलगा यश याचे आभार व्यक्त केले. पोलिसांनीही प्रामाणीक पणाचे कौतुक केले.
संपादन ः राजेश सोनवणे