एका माचिसने पोलिसांना दाखविला...हरीयाणापर्यंतचा मार्ग ! 

एका माचिसने पोलिसांना दाखविला...हरीयाणापर्यंतचा मार्ग ! 

जळगाव  ः शिवकॉलनी रेल्वे उड्डाणपुला जवळील स्टेट बँक शाखे बाहेरील एटीएम गॅस कटरने कापून त्यातील १४ लाख ४१ हजार ५०० रुपयांची रेाकड लांबवण्यात आली होती. गुन्हा दाखल होवुन २४ दिवस उलटल्यावर गुन्ह्यातील २ संशयीतांना जिल्‍हापेठ पेालिसांनी फरीदाबाद(हरीयाणा) येथील कारागृहातून ताब्यात घेतले आहे. अटकेतील देाघे सख्ये भाऊ असून गुन्ह्यातील मास्टर माईंड त्यांचा शालक पळून जाण्यात यशस्वी ठरला. निसार शकुर सैफी व इरफान शकुर सैफी असे दोघा संशयीतांची नावे असून दोघांना पोलिस कोठडीत रवाना करण्यात आले आहे. 

शिवकॉलनी बसस्टॉप समोरच स्टेटबँकेची गणेश कॉलनी शाखा आहे. बँकेच्या प्रवेशद्वारावरच एटीएम असून मध्यरात्रीनंतर १२ जुलै रेाजी रात्री भिवंडी कडून कलकत्ता कडे जाणाऱ्या कुरीयर कंटेनर महामार्गावर थांबवून त्यातून उतरलेल्या देान्ही भामट्यांनी रात्री १ः ५५ मिनिटांनी एटिएम मध्ये प्रवेश केला. एटिएमचे शटर बाहेरून लावून एक बाहेरच अधांरात दडून बसला तर, एकाने सोबत आणलेल्या गॅसकटरने एटीएम मशीन आणि त्यानंतर शेजारील सीडीएम(कॅश डीपॉझीट मशीन) एकामागून एक कापून काढले. एटीएम यंत्रातील १४ लाख ४१ हजार ५०० रुपयांची रोकड काढल्यानंतर त्या शेजारील सीडीएम मशीनही कापून काढले, मात्र त्यातील कॅश नेण्यापूर्वी चोरट्यांनी २ः३५ वाजता पेाबारा केला होता. ब्रान्च मॅनेजर दिवेश चौधरी यांच्या तक्रारीवरुन जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

माचिसने दाखवला मार्ग
चोरट्यांनी अवघ्या ३३ मिनीटात एटीएम कापुन आतून रेाकड घेत पेाबारा केला होता. घाईगरबडीत पळून जातांना चोरटा इरफान शकुर सैफी याने गॅस कटर पेटवण्यासाठी वापरलेली माचीस व गॅस लाईटर असे दोघं सेाडून दिले होते. चेारटे विसरलेली बबीता माचिस हि गुरुग्राम हरीयाणा येथील असल्याने पेालिसांचा तपास थेट हरीयाणा राज्यात निश्‍चीत झाला. गुन्हेशाखेसह जिल्‍होपठ पेालिस हरीयाणा पोलिसांच्या संपर्कात होते. 

असे काम फत्ते करुन गेले 
अटकेतील निसार शकुर सैफी (वय-३९) हा अमेझॉन कुरीयर सर्वीसचे पार्सल ने-आण करणाऱ्या कंटेनरवर चालक असून त्याचा लहानभाऊ इरफान वेल्डींग वर्कशॉप चालवतो. मात्र, कामबंद असल्याने तो, देखील भावा सोबत गाडीवर आला होता. याच कंटेनर ट्रकवर कुरर्शीद मदारी सैफी हा सेकंड ड्रायव्हर म्हणुन काही दिवसांपासुन मदतीला जात होता. भिवंडी(ता.ठाणे) येथून मालभरुन कलकत्ता पोचवल्यावर परत त्यांना भिवंडीचीच ट्रिप मिळाली. म्हणुन ये-जा करतांना महामार्गालगत असलेल्या एसबीआयच्या या एटिएमवर कुर्शीदची नजर बसली होती. १२ जुलै रोजी कुर्शीद आणि इरफान या देाघांनी अवघ्या ३३ मिनीटात साडे चौदा लाखांवर डल्ला मारला.योवेळी निसार सैफी हा ट्रकमध्येच झोपलेला होता. 

अशी झाली अटक.. 
साडे चौदालाखांसह तिघेही कलकत्त्यात दाखल झाले, वाटणीत दोघा भावंडाच्या हिश्‍यावर साडेसात लाख आले..तेथून मात्र,त्यांनी हरीयाणासाठी धाव घेतली. पुर्वीपासूनच हरीयाणा राज्याच्या सिमेवर सीआयए आणि स्थानीक पोलीस त्यांच्या प्रतिक्षेत होते. पेालीस चेकींग दरम्यान जाम लागला असतांनाच गुन्ह्यातील मास्टर माईंड शकुर सैफी याने स्वतःची बॅग उचलून आगोदरच पेाबारा केला. चेक नाक्यावर मात्र निजाम व इरफान असे दोघे भाऊ साडेसात लाखांची रोकड, गॅसकटरसह पकडले गेले. अटकेची पुष्ठी होवून जिल्‍हापेठ पेालीस ठाण्याचे निरीक्षक अकबर पटेल यांनी देाघांची ओळख पटवल्यानंतर पेालिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या सुचनेवरुन सहाय्यक निरीक्षक दिलीप शिरसाठ, जितेंद्र सुरवाडे, शेखर पाटील, फिरोज तडवी यांच्या पथकाने फरीदाबाद येथून ताब्यात घेत जळगावी आणले. जळगाव न्यायालयाने देाघांना कोठडी सुनावली आहे. 


 संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com