वाहतूक करसवलतीस ब्रेक; आदेशाची प्रतीक्षा

traffic tax breaks
traffic tax breaks

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाउनमुळे चार महिन्यांपासून पूर्णपणे ठप्प झालेल्या प्रवासी व मालवाहतूकदारांना दिलासा देण्याच्या दृष्टीने वाहतूक करात या आर्थिक वर्षात ५० टक्के सवलत देण्याबाबत शासनाने अधिसूचना तर जारी केली. मात्र, परिवहन आयुक्तांकडून आदेश न आल्याने शासनाच्या अधिसूचना अंमलबजावणीला ‘ब्रेक’ लागला आहे. 
कोरोनामुळे २४ मार्चपासून देशभरातील प्रवासी वाहतूक चार- पाच महिन्यांसाठी पूर्णपणे बंद होती. या काळात मालवाहतूक सुरू असली, तरी त्यावरही लॉकडाउनचा विपरीत परिणाम होऊन हा व्यवसाय ठप्प झाला होता. 

अद्याप प्रवासी वाहतूक नाही 
मेअखेरपर्यंत पूर्ण लॉकडाउन पाळण्यात आला. नंतर जूनपासून ‘अनलॉक’ची प्रक्रिया विविध टप्प्यांत सुरू झाली. सध्या ‘अनलॉक’चा चौथा टप्पा सुरू आहे. तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात देशभरातील प्रवासी वाहतूक काहीअंशी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात राज्य परिवहन महामंडळानेही ऑगस्टपासून ठराविक फेऱ्यांसह बस सुरू केल्या असून, तुरळक रेल्वेगाड्याही गेल्या महिन्यापासून सुरू झाल्या आहेत. पूर्णक्षमतेने अद्याप त्या सुरू झालेल्या नाहीत. 

आदेशाबाबत संभ्रम 
याबाबत शासनाने आधी एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांसाठी वाहतूक दर १०० टक्के माफ करायचा, असे धोरण ठरविले होते. मात्र, त्यात काही अडचणी आल्यानंतर एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या आर्थिक वर्षासाठी एकूण वाहतूक करात ५० टक्के सवलत द्यायची, असे धोरण ठरवून त्याबाबत अधिसूचना काढण्यात आली. शासनाने ही अधिसूचना काढली असली, तरी परिवहन विभागाच्या आयुक्तांकडून अद्याप कोणताही आदेश प्राप्त नाही. त्यामुळे या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याबाबत संभ्रम आहे. 
 
अशी आहे अधिसूचना 
‘कोविड’च्या पार्श्वभूमीवर २५ मार्चपासून देशभरात टाळेबंदी (लॉकडाउन) सुरू केल्याने नोंदणीकृत वार्षिक कर भरणा करणाऱ्या परिवहन वाहनांना दिलासा देणे आवश्‍यक होते. त्यानुसार ३१ मार्च २०२० पर्यंत ज्यांनी नियमित कर भरला असेल, अशा वाहनांसाठी वार्षिक करात ५० टक्के सुटीची मर्यादा देण्यात आली आहे. यात वार्षिक कर भरणारी मालवाहतूक वाहने, खनित्रे, पर्यटक वाहने, खासगी सेवा वाहने, खासगी कॅप वाहने, शालेय विद्यार्थी वाहतूक बस/ वाहने यांना ही सूट मिळणार आहे. 
 
जळगावचे उत्पन्न येणार १० कोटींवर 
जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रवासी व मालवाहतुकीतून दरवर्षी साधारणपणे १७, १८ कोटींवर उत्पन्न मिळत असते. एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या आर्थिक वर्षात १९ कोटी २३ लाख २७ हजार एवढे उत्पन्न मिळाले होते. त्यात या वर्षासाठी ५० टक्के सवलत द्यायची ठरल्यास ते दहा कोटींपेक्षाही कमी रकमेत मिळेल, असे दिसते. 
 
 
वाहतूक करात सवलतीबाबत निर्णय झाला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. ५० टक्के कर सवलतीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतरच बस, वाहने पूर्णक्षमतेने सुरू होऊ शकतील. 
- मुकेश बेदमुथा, अध्यक्ष, ट्रॅव्हल्स बसमालक संघटना, जळगाव 


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com