पीककर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांचा हात आखडता; केवळ 5 टक्के वाटप

farmer loan
farmer loan

जळगाव : शासनाने सर्वच बॅंकांना पीककर्ज देण्यास सांगितले. मात्र, यंदाही राष्ट्रीयीकृत बॅंकांनी दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ 5 टक्के कर्जवाटप केले. शेतकरी कोरोनाचा सामना करीत पेरणी करण्यास तयार आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या आडमुठेपणामुळे अनेक शेतकऱ्यांवर कर्जासाठी सावकाराचे दार ठोठवावे लागण्याची वेळ आली आहे. 
राज्य शासनाने लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांना फळे, भाज्या, धान्य विकण्याची मुभा दिली. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सर्वच बॅंकांनी पीककर्ज दिले पाहिजे, अशा सूचना दिल्या. मात्र, जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बॅंकांनी पीककर्जवाटपात हात आखडता घेतला आहे. पीककर्ज न देणाऱ्या बॅंकांवर गुन्हे दाखल करण्याची घोषणा केली. मात्र, ती केवळ घोषणाच ठरत आहे. अनेक शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून कर्ज घेण्यासाठी बॅंकांचे उंबरठे झिजविले. मात्र, त्यांना विविध कारणे सांगून कर्ज देणे टाळले जात आहे. 
जळगाव जिल्हा बॅंकेने एक लाख 35 हजार 43 शेतकऱ्यांना 442 कोटी 16 लाख रुपयांचे पीककर्जवाटप (44.42 टक्के) केले. त्यामानाने राष्ट्रीयीकृत बॅंकांनी अधिक शेतकऱ्यांना कर्जवाटप करायला हवे होते. मात्र, राष्ट्रीयीकृत बॅंकांनी केवळ चार हजार 335 शेतकऱ्यांना 69 कोटी एक लाख 77 हजार रुपये कर्जवाटप केले आहे. हे प्रमाण 5.14 टक्के आहे. 
 
"लीड' बॅंकेने मेळावे घ्यावेत... 
"लीड' बॅंकेने शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बॅंकांवर कारवाई करावी, कोणत्या बॅंका कर्ज देत नाहीत, याबाबत तक्रारींसाठी तालुका तालुक्‍यात मेळावे घ्यावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

सहकारी कर्जवाटपाचा ग्राफ तयार करावा.. 

बॅंकेचे नाव--कर्ज दिलेले शेतकरी--वाटप रक्कम--टक्केवारी 
जेडीसीसी बॅंक --1 लाख 35 हजार 43--442 कोटी 16 लाख--44.42 
राष्ट्रीयीकृत बॅंका --4 हजार 335--69 कोटी 1 लाख 77 हजार--5.14 
ग्रामीण बॅंका --161--1 कोटी 80 लाख 39 हजार---- 6.66 
खासगी बॅंका --1 हजार 505--56 कोटी 15 लाख 27 ---13.65 
 
 
राष्ट्रीयीकृत बॅंकांवर शासन, लोकप्रतिनिधींचा वचक नाही. अनेक शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बॅंकांनी कर्ज दिलेले नाही. या बॅंका केवळ उद्योगांना कर्ज देतात. शेतकऱ्यांना विविध कारणांनी कर्ज देत नाहीत. प्रत्येक तालुक्‍यात लीड बॅंकेने मेळावे घ्यावेत. 
-एस. बी. पाटील, सदस्य, शेतकरी सुकाणू समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com