बंद पडलेल्या कंपनीच्या नावाने बनावट खताची विक्री... चाळीसगाव कृषीविभागाने पकडला ट्रक 

 counterfeit fertilizers
counterfeit fertilizers

चाळीसगाव ः कृषी विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी शहरातील एका गोडावूनवर छापा टाकून सुमारे २५ मेट्रिक टन वजनाचे ५ लाख २५ हजार रुपये किंमतीचे १८-१८-१० या बनावट रासायनिक खताच्या सुमारे ५०० गोण्या पकडल्या. सातारा येथील बंद पडलेल्या कंपनीच्या नावे हे खत थेट गुजरात येथून ट्रकमधून आणले होते. जप्त केलेल्या बोगस खतांचा पंचनामा करण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांनी बोगस रासायनिक खतांचा ट्रक ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत घाट रोडवरील वीर कृषी केंद्राचे संचालक शैलेश छाजेड याच्यासह संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 
खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणावर बियाणे व खते खरेदी करीत आहेत. शहरात बोगस रासायनिक खत विक्रीसाठी येत असल्याची व हे खत घाटरोड वरील एका गोडावूनमध्ये उतरवले जात असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यानुसार, कृषी विभागाचे नाशिक विभागाचे गुणवत्ता नियंत्रक उल्हास ठाकूर, जळगाव जिल्हा गुणवत्ता नियंत्रक अरुण तायडे, तालुका कृषी अधिकारी सी. डी. साठे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी एस. एम. भालेराव, कृषी सहाय्यक अविनाश चंदिले, कृषी विभागाचे श्री. चव्हाण व श्री. वाणी, शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विजय साठे यांच्या पथकाने आज दुपारी चारच्या दरम्यान घाटरोडवरील महिंद्रा शोरूम जवळील गोडावूनमध्ये छापा टाकला असता, ट्रकमधून (एम. एच. १८/७३२४) जिप्सम १८.१८.१० हे रासायनिक खत उतरवले जात असल्याचे पथकाला आढळून आले. पथकाने हा साठा तपासला असता सुमारे ५ लाख २५ हजार रुपये किंमतीच्या २५ मेट्रिक टन असलेल्या खताच्या ५०० बॅगा मिळून आल्या. 

दीशेच्या खताची एक हजारांत विक्री! 
पथकाने या रासायनिक खतांची तपासणी केली असता, ते सातारा येथील एका बंद पडलेल्या खत कंपनीचे नाव वापरून आणल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. गुजरात येथून हा बोगस रासायनिक खताचा ट्रक चाळीसगावला आणून त्याची चढ्या भावाने शेतकऱ्यांना विक्री करून फसवणूक करण्याचा हा डाव होता. प्राप्त माहितीनुसार, हे बनावट खत केवळ १५० रुपयांचे असून, ते बाजारात १ हजार ५० रुपयाने शेतकऱ्यांना विकले जाते. यापूर्वी देखील या व्यापाऱ्याने बनावट खत विकल्याची चर्चा आहे. 

दोघांना घेतले ताब्यात 
कृषी विभागाने या बनावट खताचा पंचनामा करून ट्रकसह दोघा चालकांनाही ताब्यात घेतले. हे खत ज्यांच्या गोडावूनमध्ये ठेवले जात होते, त्या रमेश अर्जुन पाटील व भिकन अर्जुन पाटील यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, त्यांनी महावीर कृषी केंद्राचे संचालक शैलेश छाजेड यांना भाड्याने गोडावून दिल्याचे सांगितले. शेतकरी फसवले जाण्यापूर्वीच कृषी विभागाने ही कारवाई केली. 


 

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com