esakal | कोरोनामुळे शरद पवारांचा खानदेश दौरा दुसऱ्यांदा रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे होते. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रेश केल्यानंतर शरद पवार यांचा प्रथमच उत्तर महाराष्ट्राचा दौरा होता. यामुळे या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व समजले जात होते.

कोरोनामुळे शरद पवारांचा खानदेश दौरा दुसऱ्यांदा रद्द

sakal_logo
By
राजेश सोनवणे

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचा 20 व 21 नोव्हेंबरला खानदेश दौऱ्यावर होते. मात्र कोरोनामुळे शरद पवार यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. आठ महिन्यात शरद पवार यांचा दोन वेळेस निश्‍चित झालेला दौरा कोरोनामुळे रद्द करावा लागला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे होते. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रेश केल्यानंतर शरद पवार यांचा प्रथमच उत्तर महाराष्ट्राचा दौरा होता. यामुळे या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व समजले जात होते. शरद पवार 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार याठिकाणी शेतकरी मेळावा आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने शरद पवार येणार होते. मात्र सदरचा दौरा रद्द करण्याची वेळ आली आहे.

पुन्हा एकदा कोरोनाचे कारण
शरद पवार खानदेश दौऱ्यावर यापुर्वी देखील म्‍हणजे मार्च महिन्यात येणार होते. मार्च महिन्यात चांदसर (ता. धरणगाव) येथे कार्यक्रमानिमित्‍ताने येणार होते. परंतु, राज्‍यात कोरोनाला सुरवात झाल्‍यानंतर हा कार्यक्रम देखील ऐनवेळी रद्द करण्यात आला होता. तर येत्‍या २० व २१ नोव्हेंबरला शरद पवार यांचा दौरा निश्‍चित केला होता. परंतु धुळे, नंदुरबार जिल्ह्याचा होणारा दौरा रोहिणी खडसे कोरोना पॉझिटिव्ह शिवाय एकनाथ खडसे देखील क्‍वारंटाईन असल्‍याचे सांगण्यात येत आल्यामुळे दौरा रद्द करण्यात आला आहे.

धुळे, नंदुरबारमध्ये होते शेतकरी मेळावे
एकनाथ खडसे यांनी महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसे यांच्या प्रवेशानंतर भाजपचा बाले किल्ला असलेल्या उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. याता शरद पवार हे 20 आणि 21 तारखेला धुळे आणि नंदुरबार येथे शेतकरी मेळावा आणि विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्राचा दौरा येणार होते. परंतु हे कार्यक्रम रद्द होवून लांबणीवर पडला आहे.