शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुखपदी भंगाळे, मानेंची नियुक्ती

शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुखपदी भंगाळे, मानेंची नियुक्ती
jalgaon shiv sena
jalgaon shiv senasakal

जळगाव : राज्यात पक्ष मजबूत करण्यासाठी आता शिवसेनेने (Shiv sena) कंबर कसली आहे. तीन विधानसभा क्षेत्रासाठी एक जिल्हाप्रमुख नियुक्त करण्यात येत आहे. जळगाव (Jalgaon shiv sena leader vishnu bhangale harshal mane) जिल्हाप्रमुख पदी विष्णु भंगाळे व हर्षल माने यांची नियुक्ती गुरुवारी (ता. ३) जाहिर करण्यात आली. (jalgaon-shiv-sena-vishnu-bhangale-and-harshal-mane-District-Chief)

jalgaon shiv sena
ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे आंदोलन; गिरीश महाजनांचे नेतृत्‍व

खानदेशात लोकसभा क्षेत्रनिहाय जिल्हाप्रमुख नियुक्त करण्यात आले होते. त्यामुळे जळगाव, रावेर लोकसभा मतदार संघासाठी दोन जिल्हाप्रमुख होते. आता विधानसभा क्षेत्रनिहाय जिल्हाप्रमुख असणार आहेत. तीन विधानसभेसाठी एक जिल्हा प्रमुख नियुक्त करण्यात आला असून त्यावर एक जिल्हा संपर्कप्रमुख असेल. जळगाव जिल्ह्यात जळगाव लोकसभा क्षेत्रात नवीन पद्धतीने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. जळगाव, अमळनेर, जळगाव ग्रामीण, विधानसभा क्षेत्र जिल्हाप्रमुखपदी विष्णु भंगाळे तर पारोळा, पाचोरा, चाळीसगाव या विधानसभा क्षेत्रांसाठी हर्षल माने यांची जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दोघेही स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेत सदस्‍य

विष्णु भंगाळे हे जळगाव महापालिकेत (Shiv sena jalgaon corporation) शिवसेना नगरसेवक आहेत. ते माजी महापौर आहेत. कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे ते सिनेट सदस्य आहेत. तर हर्षल माने हे जिल्हा परिषद सदस्य आहेत. माजी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ हे आता जिल्हा संपर्कप्रमुख असतील. तर आता रावेर लोकसभा क्षेत्रात आता अशाच पद्घतीने नियुक्त्या करण्यात येणारे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com