बुडणाऱ्या शेतकऱ्याचे दोघांनी थरारक पद्धतीने वाचविले प्राण

गेल्या आठवडाभरापासून नदीला पूर असल्याने बैलांना पाणी पाजण्याच्या नेहमीच्या ठिकाणी खड्डा पडला त्यामुळे दोघे बैल बैलगाडी सह पाण्यात पडले.
बुडणाऱ्या शेतकऱ्याचे दोघांनी थरारक पद्धतीने वाचविले प्राण
Updated on

पाचोराः एखाद्या अपघाती घटनेत वाचलेले जीव पाहून काळ आला होता पण वेळ आली नव्हती या वाक्याचा वापर करण्यात येत असल्याचे आपण ऐकतो अथवा अनुभवतो देखील. असाच काहीसा प्रकार लासुरे (ता. पाचोरा) येथील अतुल देवरे या शेतकऱ्याबाबत (Farmer) घडला असून काळ आला होता पण तडवी व कोळी यांनी पुराच्या (drowning) पाण्यात उड्या मारल्या नसत्या तर बैलासह शेतकऱ्याला प्राण गमवावे लागले असते याची अनुभूती ग्रामस्थांना आली. तडवी व कोळी यांच्या धाडसाचे व प्रसंगावधानतेचे कौतुक होत आहे.

बुडणाऱ्या शेतकऱ्याचे दोघांनी थरारक पद्धतीने वाचविले प्राण
एमपीएससीत एका मार्काने आले अपयश..तरुणाने उचले टोकाचे पाऊल


लासुरे ( ता. पाचोरा) येथील अतुल देवरे (वय 32) हे आपला चुलत भाऊ कपिल देवरे यांच्या मालकीची बैलगाडी घेऊन शेताकडे निघाले होते. गावा बाहेरच्या रस्त्यावर नदीकाठी नेहमीच्या ठिकाणी बैलांना पाणी पाजण्यासाठी ते बैलगाडीसह थांबले असता पाणी पीत असताना बैलांचे पाय अचानक घसरले व बैलगाडीसह अतुल देवरे हे पुराच्या पाण्यात पडले. हा प्रकार जवळच असलेल्या मस्तान तडवी ( लासुरे) व सागर कोळी (वरखेडी) यांनी बघितला व त्यांनी बैलांसह शेतकऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी क्षणाचाही विलंब न करता पुराच्या पाण्यात उड्या घेतल्या.

बैलाचा मृत्यू

प्रथम पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या अतुल देवरे यांना त्यांनी बाहेर काढले नंतर एक बैल बाहेर काढला. दुसरा बैलही हाती लागला परंतु तो मृत झालेला होता. कपिल देवरे यांचा 40 हजाराचा बैल या घटनेत मृत झाला.

बुडणाऱ्या शेतकऱ्याचे दोघांनी थरारक पद्धतीने वाचविले प्राण
जळगाव जिल्ह्यात ७० टक्के लसीकरण

गेल्या आठवडाभरापासून नदीला पूर असल्याने बैलांना पाणी पाजण्याच्या नेहमीच्या ठिकाणी खड्डा पडला त्यामुळे दोघे बैल बैलगाडी सह पाण्यात पडले तडवी व कोळी या दोघांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन बैल व शेतकऱ्याला वाचवण्यासाठी पुराच्या पाण्यात मारलेली उडी अतुल देवरे व एका बैलाचा प्राण वाचविण्यात यशस्वी झाली. या दोघांच्या धाडसाचे कौतुक होत आहे .पोलीस पाटील संजय पाटील, तलाठी रूपाली रायगडे, पशुवैद्यक अधिकारी महाजन यांनी घटनास्थळी भेट दिली मृत बैलाचे शवविच्छेदन केले. या घटनेमुळे काळ आला होता पण तडवी व कोळी यांनी उड्या मारल्या नसत्या तर. . . याच विषयाची भीतीदायी व थरकाप उडविणारी चर्चा लासुरे व वरखेडी गावात रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com