esakal | एमपीएससीत एका मार्काने आले अपयश..तरुणाने उचले टोकाचे पाऊल
sakal

बोलून बातमी शोधा

एमपीएससीत एका मार्काने आले अपयश..तरुणाने उचले टोकाचे पाऊल

एमपीएससीत एका मार्काने आले अपयश..तरुणाने उचले टोकाचे पाऊल

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) परीक्षेत एका मार्काने अपयश आल्याने नैराश्यातून एका तरुणाने (Young Man) गळफास घेऊन आत्महत्या (Suicide by strangulation) केली. किशोर भटू जाधव (वय २८) (रा. वाघाडी खुर्द. ता. शिंदखेडा ) असे मृत तरुणाचे नाव असून औरंगाबाद येथे परीक्षेचा सराव करीत होता तेथेच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी समोर आली. त्याचे वर्ग एक अधिकारी बनण्याचे स्वप्न अपूर्णच राहीले.

हेही वाचा: संत चांगदेव मंदिर; नौकाविहार अन् अमाप उत्साह

क्लास वनचा अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षेसाठी सराव करत असतांना नुकताच स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून एक मार्काने यादीत नाव हुकल्याने नैराश्यातून किशोर जाधव याने औरंगाबाद येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती देतांना वडीलांचे डोळ्यात अश्रु अनावर झाले होते.

औरंगाबादला परिक्षेची तयारी

शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी खुर्द येथील किशोर भटू जाधव हा तरुण दोन वर्षे धुळे येथे तर चार वर्षांपासून औरंगाबाद येथे असे गेल्या सहा वर्षांपासून स्पर्धा परीक्षासाठी सराव( तयारी) करीत होता. वडील भटू हरी जाधव हे वाघाडीखुर्द गृप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असून मुखव्यवसाय शेती करतात. त्यांना तीन मुले आहेत. मोठा मुलगा विकास हा पुणे येथे स्वॉप्टवेअर इंजिनीअर आहे. तर लहान चेतन नागपूर येथे खंडपीठात लिपीक म्हणून नोकरीला आहे. किशोर हा द्वितीय मुलगा होता.

हेही वाचा: ऋषिकेश मधील हे धबधबे आहे अतिशय सुंदर..!

नुकताच स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून एक मार्काने यादीत नाव हुकल्याने नैराश्यातून किशोर जाधव याने औरंगाबाद येथे बाबा पेट्रोल पंप जवळील वसाहतीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी समोर आली. वाघाडी खुर्द येथे वडीलांना फोनवरून माहीती मिळाल्याने आई वडिलांनी हंबरडा फोडला.फक्त क्लास १ अधिकारी बनण्याचे स्वप्न अधूरेच राहीले. 

आधी उंची आणि आता एक मार्क कमी

याआधी किशोर जाधव याने स्पर्धा परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक ची परीक्षा पास झाला होता परंतु उंची कमी पडल्याने संधी मिळाली नाही. स्पर्धा परीक्षेतून अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयात वरीष्ठ लिपीक म्हणून नोकरी लागली होती. परंतू क्लास वन बनण्याचे स्वप्न होते म्हणून नोकरी स्वीकारली नाही. त्यावेळी स्पर्धा परीक्षेत २६ वा क्रमांक मिळविला होता.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात ७० टक्के लसीकरण

सायंकाळी होणार अंत्यसंस्कार

एसटीआयची प्रथम परीक्षेत यश मिळविले आता दुसरी परीक्षेची तयारी सुरू होती. फेब्रुवारी मध्ये दिल्ली येथे क्लास वनसाठी मुलाखत दिली आहे. त्याचा निकाल अजून बाकी आहे. बुध्दीवान व हुशार तरुणाला आई वडील व दोन भाऊ असा परिवाराला व जगाला सोडून जावे लागले. किशोर चे शवविच्छेदन औरंगाबाद येथे करुन गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत वाघाडीखुर्द येथे आणण्यात येणार असून शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

loading image
go to top