esakal | बैलपोळा: सणासाठी बाजार गजबजला
sakal

बोलून बातमी शोधा

बैलपोळा: सणासाठी बाजार गजबजला

शनिवारचा बाजार यामुळे चांगलाच गजबजला होता.

बैलपोळा: सणासाठी बाजार गजबजला

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव: बळीराजाचे लाडका सर्जाराजाचा सण अर्थाल बैल पोळा. अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. नुकताच पाऊसही चांगला झाल्याने सर्जाराजाचा बैलापोळा साजरा करण्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्याच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली होती. शनिवारचा बाजार यामुळे चांगलाच गजबजला होता.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात आता दररोज १ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट

कोरोना नंतर पहिल्यादा बैलपोळा येत्या सोमवारी (ता.६) यंदा साजरा होणार आहे. बैलांना सजविण्यासाठी तसेच त्यांच्या अंगावर घालण्यासाठी लागणारे झुल, घंटी, घूंगर, पैंजण आदी साहित्यांना आज मागणी होती. दोर, मोरकी, गोंडा, झुल, पितळीकडी, भोरकडी, घंटी पितळी, लोखंडी घंटी बाजारात उपलब्ध आहे.

हेही वाचा: गाय, म्हशीच्या दूध खरेदीदरात वाढ; जळगाव जिल्हा दूध संघाचा निर्णय

फॅन्सी माळा प्रथमच

बैलांना पारंपारीक पध्दतीने सजविले जाते. मात्र यंदा प्रथमच फॅन्सी प्लास्टीकच्या बाजारात आल्या आहेत. त्यात २५ प्रकार आहेत. नवीन प्रकारात गोफ दहा प्रकारात आहे. याशिवाय पैंजणही आहेत. बैलांना सजविण्यासाठी लागणाऱ्या एका सटाची किंमत साडेतीनशे ते एक हजारापर्यंत आहे, अशी माहिती जे.एम.गांधी ट्रेडसचे संचालक दिलीप गांधी यांनी ‘सकाळ’ला दिली. यंदा या साहित्यात किंचत वाढ झाली आहे. मात्र आम्ही मागील वर्षीचे दरच कायम ठेवले आहेत.

loading image
go to top