तहसीलदार वैशाली हिंगे यांची नंदुरबारला बदली

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

सामान्य प्रशासन विभागाच्या 15 सप्टेंबर 2018 रोजीच्या शासन निर्णयातील नमूद तरतुदीनुसार त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे द्यावा.

जळगाव : येथील तहसीलदार वैशाली शिंदे यांची नंदुरबार येथे सरदार सरोवर प्रकल्पाच्या उपसचिव पदी बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आज शासनाने पारित झाले.
सदरील आदेश तात्काळ अमलात येत असून वैशाली हिंगे यांनी पदाचा स्थापनेच्या पदावर तात्काळ रजू करण्यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात येते की वरील बदलीच्या पदावर रुजू होण्याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे. सामान्य प्रशासन विभागाच्या 15 सप्टेंबर 2018 रोजीच्या शासन निर्णयातील नमूद तरतुदीनुसार त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे द्यावा. तसेच संबंधित अधिकारी नवीन नियुक्तीच्या जागी कोणत्या दिनांकास हजर झाले; याबाबत शासनास कळवावे.
हिंगे यांना पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम व नुसार मोड कार्यालयाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्वीकारून नयेत.

तात्‍काळ हजरचे आदेश
सदरहू बदली आदेशानुसार तात्काळ पदस्थापनाच्या पदावर रुजू होण्याचे आदेश आहेत. रूजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकाराचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूकचे उल्लंघन करणारी असल्यामुळे ती युनिक वर्तणूक समजून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon tahashildar vaishali hinge transfer nandurbar