डाळ खाताय मग सावधान...डाळीला लावलाय जातोय घातक टाल्कचा लेप !

डाळ खाताय मग सावधान...डाळीला लावलाय जातोय घातक टाल्कचा लेप !


जळगाव ः उडीद मोगर व मूगडाळीला मॅग्नेशियम सिलिकेट असलेले टाल्क हे केमिकल लावून पॉलिश करून ठेवलेला अडीच लाखांचा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत जप्त करण्यात आला. हे शरीरासाठी घातक रसायनही या ठिकाणाहून जप्त करण्यात आले. 


कोरोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर देशभरात लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे वाहतूक व एकूणच उत्पादन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे काही पुरवठादार मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त माल पुरवठा करत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अशीच गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने जळगाव एमआयडीसीतील एका डाळप्रक्रिया उद्योग असलेल्या मिलवर अचानक छापा टाकून तपासणी केली. त्यात मिलमधील उडीद मोगर व मूगडाळीला खाद्यरंग व सॉफ्ट स्टोन पावडर लावली जात असल्याचे आढळून आले. अशा भेसळयुक्त डाळीचा २,३८८ किलो साठ्याचे नमुने घेण्यात आले. डाळीला कोणत्याही प्रकारचे रंग लावणे अन्नसुरक्षा मानके कायद्यानुसार गुन्हा असल्याने यापैकी ७५८ किलोचा साठा जप्त करण्यात आला. सहाय्यक आयुक्त वाय. के. बेंडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी ही कारवाई केली. 

काय आहे ‘सॉफ्ट स्टोन’? 
या डाळींना लावले जात असलेले सॉफ्ट स्टोन हे टेल्कम पावडर (चेहऱ्याला लावली जाणारी) मध्ये वापरले जाते. त्यात मॅग्नेशियम सिलिकेट नावाचे रसायन असते. या रसायनाचे शरीरासाठी अत्यंत घातक परिणाम होता. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com