कुंझरकरांच्या मृत्यूचा उलगडा; दोन तास मारहाण बघ्यांनी पाहिली पण... 

रईस शेख
Saturday, 19 December 2020

धुळ्याचा कार्यक्रम आटोपल्यावर ते, सुरतला जाणार होते. सकाळी घरातून निघतांना पत्नी झोपेत होती, तर मुलाकडून गेटची चावी घेवून ते बाहेर पडले.

  जळगाव : गालापुरा येथील जिल्हा परिषद शाळेचे उपक्रशील व आदर्श शिक्षक तथा मुख्याध्यापक किशोर पाटील-कुंझरकर (वय ४२) यांचा खुनाचा उलगडा आठ दिवसानंतर तांत्रीक दुव्यांवर पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा पोलिसांनी लावला आहे. 
स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने सीसीटीव्हीचा भक्कम पुरव्याच्या आधारावर संशयीतांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. 

महत्वाची बातमी-  ‘कोरोना’ लसीचे दोन डोस; जळगावात जानेवारीत येणार लस

अशी घडली होती घटना...  
मुख्याध्यापक किशोर पाटिल-कुंझरकर(वय-४२) घटनेच्या पहाटे (ता.१०) रोजी पहाटे साडेतीन वाजता धुळे कडे जाण्यासाठी घरातून निघाले होते. धुळ्याचा कार्यक्रम आटोपल्यावर ते, सुरतला जाणार होते. सकाळी घरातून निघतांना पत्नी झोपेत होती, तर मुलाकडून गेटची चावी घेवून ते बाहेर पडले. सकाळी आठ वाजताच अचानक त्यांच्या मृत्युची बातमी धडकली. 
तालूक्यातील पळासदळ भागात बेवारस स्थीतीत त्यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. 

गुप्त माहितीवरून दोघांना अटक
एरंडोल पेालिसांत गुन्ह्याची नोंद होवुन पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, गुन्हेशाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले घटना घडल्या पासून तपासावर लक्ष देऊन होते. या घटनेत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असतांनाही कोणीच पेालिसांना सहकार्य करत नव्हते. बकाले यांच्या पथकातील विजयसींग पाटील एरंडोल परिसरात ठाण मांडून होते. त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वाल्मीक रामकृष्ण पाटिल-देवरे (वय-३२,रा. सोनबर्डी ), आबा भारत पाटिल -पवार (वय-२५) दोन्ही राहणार सोनबर्डी, ता. एरंडोल अशा दोघांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. 

आवश्य वाचा- रात्री गप्पा मारल्या अन पहाटे घेतला गळफास

सीसीटिव्ही ठरले तपासातील दुवा 
किशोर पाटिल-कुंझरकर यांना पहाटे साडेतीन ते, पाच वाजे पर्यंत दोघे मारेकरी वारंवार मारझोड करीत होते. शेकोटीवर हात शेकत असतांना शिक्षक पाटिल यांनी दोघांशी बोलणे होवून धुळ्या पर्यंत दुचाकीने सोडून देण्याचे ठरले, त्यासाठी गाडीत पेट्रोलही टाकून देण्यास कुंझरकर यांनी तयारी दर्शवली होती. मात्र, तिघांमध्ये अपसांत खटके उउून देाघांनी शिवीगाळ करून शिक्षकांना मारहाण करण्यास सुरवात केली. घडला घटना क्रम जवळपास १५-२० लोकांनी डेाळ्यांनी बघीतला होता. मात्र, पेालिसांना कोणीही मदत करण्यास धजावला नाही. अखेर तांत्रिक पुराव्यांच्या अधार घेत पेालिसांनी सीसीटीव्ही फुटेज संकलीत केले. तास्‌तास फुटेजचे अवलोकन केल्यावर मारहाणीची घटना एकात आढळून आली. मात्र, त्यात चेहरे स्पष्ट होत नसल्याने गुन्हा उघड होण्यास दहा दिवसांचा विलंब लागल्याचेही पेालिसांनी सांगीतले. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon teacher murder case jalgaon caught killer police