
डिलीव्हरी बाॅयच्या बॅगमध्ये पार्सलचा सामान जास्त असल्याने त्यांनी बॅग दुचाकीवर ठेवून पार्सल देण्यासाठी गेले. दोन मिनीटात पार्सल देवून खाली आले असता त्यांच्या दुचाकीवरून आज्ञात चोरट्यांनी पार्सलची बॅग लंपास केली.
जळगाव ः फ्लिपकार्टचे पार्सल वाटप करणाऱया तरुणाचमी बॅग चोरट्यांनी लांबविल्याची घटना गुरूवारी दुपारी जळगाव शहरातील दृष्टी हॉस्पिटलसमोर घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फूटेज मिळवीत अवघ्या 24 तासात दोन संशयितांना अटक केली.
आवश्य वाचा- रूग्ण घटले तरी ॲन्टिजेन किटचा तुटवडा; संपर्कातील व्यक्तींच्या टेस्टिंग नाहीच
पिंप्राळा परिसरातील शांतीनगरात राहीवासी संजय सोपान पाटील (वय-३०) हे तीन ते चार वर्षांपासून फ्लिपकार्टचे पार्सल डिलेव्हरीचे काम करतात. गुरूवारी सकाळी १० वाजता फिल्पकार्टचे पार्सल बॅगमध्ये वस्तू डिलेव्हरीसाठी बाहेर पडले असता दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील रामा बिअर बार जवळील दृष्टी हॉस्पिटलमध्ये पार्सल देण्यासाठी संजय पाटील गेले. त्यांच्या बॅगमध्ये पार्सलचा सामान जास्त असल्याने त्यांनी बॅग दुचाकीवर ठेवून पार्सल देण्यासाठी गेले. दोन मिनीटात पार्सल देवून खाली आले असता त्यांच्या दुचाकीवरून आज्ञात चोरट्यांनी पार्सलची बॅग लंपास केली. बॅगेत विविध पार्सलचे एकुण ४२ हजार २०३ रूपये किंमतीचे सामान होते. संजय पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चोरट्यांचा 24 तासात छडा
पोलिसांनी जवळील इमारतीमध्ये लावलेले सिसिटीव्ही कॅमेराचे फुटेज मिळवीले. आणि फुटेच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पंकज शिंदे, परेश महाजन यांनी 24 तासात कुणाल शिवराज पाटील रा. हरिविठ्ठल नगर, नितीन बागडे या दोन संशयीत आरोपींना अटक केली.