तेरा जणांना प्लाझ्मा थेरपीने मिळाले जीवदान 

तेरा जणांना प्लाझ्मा थेरपीने मिळाले जीवदान 

जळगाव  : कोरोना आजारातून बरे झालेल्या १३ जणांनी प्लाझ्मा दान केल्याने १३ जणांचे प्राण वाचले आहेत. कोरोनामुक्त झालेला रुग्ण २८ दिवसांनंतर कोणत्याही लक्षणाशिवाय राहिल्यास त्याचा प्लाझ्मा दुसऱ्या बाधित रुग्णाला देता येतो. जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करून इतर रुग्णांचे जीवन वाचवावे. ती काळाची गरज आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. 

जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, की प्लाइमा दानप्रक्रिया रक्तदान प्रकियेप्रमाणेच आहे. १८ ते ६० वयोगटांतील ज्या व्यक्तीचे वजन ५० किलोपेक्षा जास्त आहे, त्याचे हिमोग्लोबीन १२.५ पेक्षा जास्त आहे, अशी कोरोनामुक्त व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकते. जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे. प्लाझ्मा दानामुळे कोणताही धोका त्या व्यक्तीला पोचत नाही. प्लाझ्मा दानामुळे दोन व्यक्तींचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे कोरोनामुक्त व्यक्तीला त्यांच्या परिचित व्यक्ती, नातेवाइकांनी प्लाझ्मा दानासाठी प्रवृत्त करावे. 


जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्याला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत आहेत. पालकमंत्र्यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन जिल्ह्यातील पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाबरोबरच इतरही काही बरे झालेल्या १३ रुग्णांनी प्लाझ्मा दान केले. त्यातून १३ जणांचे प्राण वाचले आहेत. 

रक्तदान केल्यानंतर रक्तदात्याला काही त्रास होत नाही, त्याप्रमाणे प्लाझ्मा दान केलेल्यांना काही त्रास होत नाही. प्लाझ्मा दान करून आपण एकाचा जीव वाचवू शकतो. एखाद्याचा जीव वाचविणे मोठे काम आहे. अधिकाधिक जणांनी प्लाझ्मा दान करावे. 
-डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, चेअरमन, रेडक्रॉस सोसायटी  

संपादन- भूषण श्रीखंडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com