प्रवासात ‘कन्फर्म’ तिकिटासह ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप आवश्यक 

प्रवासात ‘कन्फर्म’ तिकिटासह ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप आवश्यक 

भुसावळ  : रेल्वे मंत्रालयाने एक जूनपासून प्रवाशांसाठी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षित प्रवासासाठी सुरवातीला आणि स्थानकात ‘कोरोना’चे दुष्परिणाम लक्षात घेता विशेष खबरदारी घ्यावी लागेल. 

प्रवास करताना प्रवाशांकडे ‘कन्फर्म’ तिकीट असेल तरच स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप मोबाईलमध्ये डाउनलोड करणे आवश्यक असेल. गाडी सुटण्याच्या किमान ९० मिनिटांपूर्वी स्थानकात पोचणे आवश्यक आहे. जेणेकरून थर्मल स्क्रिनिंग करता येईल. प्रवाशाला तीव्र तापाची लक्षणे आढळल्यास त्याला प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. असे प्रवासी तिकीट परीक्षकांकडून विनाप्रवास प्रमाणपत्र घेऊन तिकिटांची संपूर्ण रक्कम घेऊ शकतात. रेल्वे प्रवाशांना स्थानक आणि गाड्यांमध्ये सामाजिक अंतर ठेवून प्रवास करावा लागणार आहे. वातानुकूलित कोचमध्ये पडदे बसविले जाणार नाहीत आणि प्रवासादरम्यान बेडरोलही दिले जाणार नाहीत. प्रवाशांना त्यांचा बेडरोल सोबत घ्यावा लागेल. स्टॉलवर सामान घेताना सामाजिक अंतराची काळजी घ्यावी लागेल. यासंदर्भात रेल्वेस्थानकांत राज्य सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन प्रवाशांना करावे लागेल. 

भुसावळ विभागात १६ गाड्या 
कुशीनगर एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस, कामायनी एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, पुष्पक एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस, संपर्क क्रांती एक्स्प्रेस, सचखंड एक्स्प्रेस, हावडा-मुंबई मेल, अहमदाबाद- हावडा एक्स्प्रेस, ताप्ती गंगा एक्स्प्रेस, जनता एक्स्प्रेस, पाटलीपुत्र एक्स्प्रेस, गोरखपूर- लोकमान्य तिलक टर्मिनस एक्स्प्रेस, पुणे- दानापुर एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस- गोवाहाटी एक्स्प्रेस, अहमदाबाद- मुजफ्फरपुर एक्स्प्रेस वाया सुरत, अहमदाबाद ते गोरखपूर एक्स्प्रेस वाया सुरत, गोवा एक्स्प्रेस या गाड्या भुसावळ विभागातून धावतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com