
जळगावकरांसाठी महत्वाची बातमी.. तीन दिवस किराणा दुकाने बारापर्यंत राहणार सुरु !
जळगाव ः न्यायालयाकडील (Court) २६ एप्रिलच्या निर्देशास अधीन राहून, १२ ते १४ मे या कालावधीत रमजान ईद (Eid) (ईद-उल-फितर) व अक्षयतृतीया (Akshay Tritiya) या सणानिमित्त (Festival) जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Abhijeet Raut) यांनी विशेष निर्बंधामध्ये सुट दिली आहे. आता १४ तारखेपर्यंत दूपारी बारापर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू असतील.
( jalgaon city festival three day grocery store for continue until twelve)
हेही वाचा: शॉर्टसर्किटमूळे लागली आग..आणि पती-पत्नीचा साखर झोपत मृत्यू
इद सणानिमित्त समाज बांधवांना खाद्य पदार्थ, फळे, ड्रायफ्रुट घेण्यासाठी सकाळी ७ ते १२ पर्यंत किराणा दुकाने (grocery store) , ड्रायफ्रुटस (frute) दुकाने, भाजीपाला (Vegetables), फळविक्री, अंडी, चिकन, मटन, मासे विक्रीची दुकाने, बेकरी, दुध विक्री केंद्रे सुरु राहतील. सणानिमित्त एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये याकरीता नागरिकांनी आपल्या प्रभागातील/वार्डातील दुकानातून खरेदी करावी. शक्यतो होम डिलिव्हरीस प्राधान्य देण्यात यावे व खरेदीसाठी जातांना नागरिकांनी शक्यतो वाहनाचा वापर टाळावा. दुकान मालक/चालक यांनी दुकानामध्ये एका वेळेस ५ पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश देऊ नये. दुकानासमोर गर्दी होऊ नये याकरीता दुकानासमोर वर्तुळ तयार करुन नागरिकांना सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्याबाबत सूचित करावे.
देण्यात आलेल्या सुटमध्ये दुकानदार व नागरिक यांनी कोविड-१९ नियमावलीचे पालन करावे. तसेच नियमांचे उल्लघंन करणाऱ्या आस्थापना, नागरिक यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभाग यांनी संयुक्तरित्या कारवाई करावी. याबाबी व्यतिरिक्त २२ व ३० एप्रिल, २०२१ अन्वये लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील.
हेही वाचा: खरीपपूर्व कापूस लागवडीची तयारी पूर्ण..पण उत्पादन घटण्याची भीती !
या आदेशाचे उल्लघंन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, १८६० (४५) चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० व फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.
( jalgaon city festival three day grocery store for continue until twelve)
Web Title: Marathi News Jalgaon City Festival Three Day Grocery Store For Continue Until
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..