
कक्षातील कर्मचारी व अधिकारी यांनी कार्यालयाच्या चाव्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ पी. सी. शिरसाठ यांच्याकडे सुपूर्द केल्या.
जळगाव : ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाच्या हेतूने कार्यान्वित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे खाजगीकरण करण्याचे षडयंत्र शासनाने सुरू केले आहे. यामुळे उमेदच्या कर्मचाऱयांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.
वाचा- पक्षी निरीक्षणात पहिल्याच दिवशी ‘लॉंग लेग्ड बझार्ड’चे दर्शन !
महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्य़ातील साडे चार लाख महिला बचत गटातील ५० लाख महिला, गावपातळीवरील महिला कर्मचारी तसेच अभियानाच्या राज्य, जिल्हा व तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाच्या सुमारे ३५०० कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे गुरूवार पासून कर्मचारी, बचत गट, समुह संसाधन व्यक्ती यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
त्रयस्थ संस्थेकडे दिली पुनर्नियुक्ती
चोवीस तास सेवा देणाऱ्या कर्मचार्यांना शासन सीएससी एसपीव्ही या वादग्रस्त त्रयस्थ संस्थेकडून पुनर्नियुक्ती देणार असल्याचे शासनाने जाहीर केले. परिणामी सेवेची हमी उरली नसलेल्या कर्मचार्यांची उमेद हरविली आहे.
कार्यालयाच्या चाव्या ग्रामीण विकास संचालला दिल्या
यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षातील कर्मचारी व अधिकारी यांनी कार्यालयाच्या चाव्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ पी. सी. शिरसाठ यांच्याकडे सुपूर्द केल्या.