esakal | भर पावसात मंत्री सामंताची गाडी अडविली; एबीव्हीपी कार्यकर्‍त्‍यांची घोषणाबाजी
sakal

बोलून बातमी शोधा

uday samant

धुळे येथे एबीव्हीपीच्या कार्यकर्‍त्‍यांना पोलिसांकडून मारहाण झाली होती. पंधरा दिवसांपुर्वी घडलेल्‍या या घटनेचे पडसाद आज विद्यापीठ परिसरात उमटले. कवियीत्री बहिणाबाई चौधरी उत्‍तर महाराष्‍ट्र विद्यापीठात उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत आले होते.

भर पावसात मंत्री सामंताची गाडी अडविली; एबीव्हीपी कार्यकर्‍त्‍यांची घोषणाबाजी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कोरोनामुळे लांबलेल्‍या अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत न्यायालयाने दिलेल्‍या निर्णयानुसार विद्यापीठात परिक्षांची सुरू असलेल्‍या तयारीचा आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत विद्यापीठात आले हेाते. बैठक घेवून परतत असताना एबीव्हीपीच्या कार्यकर्‍त्‍यांनी सामंताची गाडी अडवत प्रचंड घोषणाबाजी केली. 

संबंधीत बातमी- विद्यापीठात सुरू होणार संत मुक्‍ताई अध्‍यासन केंद्र


धुळे येथे एबीव्हीपीच्या कार्यकर्‍त्‍यांना पोलिसांकडून मारहाण झाली होती. पंधरा दिवसांपुर्वी घडलेल्‍या या घटनेचे पडसाद आज विद्यापीठ परिसरात उमटले. कवियीत्री बहिणाबाई चौधरी उत्‍तर महाराष्‍ट्र विद्यापीठात उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत आले होते. त्‍यांनी विद्यापीठात आढावा बैठक घेतली. ही बैठक आटोपून सामंत गाडीतून निघाले असताना एबीव्हीपीच्या दहा ते पंधरा कार्यकर्‍त्‍यांनी त्‍यांची गाडी अडविली. गाडीपुढे उभे राहून त्‍यांनी धुळे येथील घटनेचा निषेध करत प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी येथे उपस्‍थित असलेल्‍या पोलिसांनी काही कार्यकर्‍त्‍यांना अटक केली. यामुळे विद्यापीठ परिसरात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता.

पाऊस अन्‌ पोलिस असतानाही गाडी अडविली
बैठकीसाठी उदय सामंत आले असल्‍याने विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्‍त लावण्यात आलेला होता. कोणत्‍याही प्रकारचा गोंधळ निर्माण होवू नये याची दक्षता घेण्यात आली होती. तरी देखील एबीव्हीपीच्या कार्यकर्‍त्‍यांनी गाडी अडविली. विशेष म्‍हणजे बैठक आटोपून उदय सामंत निघण्याच्या तयारीत असताना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसास सुरवात झाली. अशा पावसात देखील कार्यकर्ते मागे न हटता सामंतांच्या गाडीपुढे उभे राहिले होते.
 

loading image