विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेला प्रथमच जाणार ३९ हजार विद्यार्थी सामोरे 

विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेला प्रथमच जाणार ३९ हजार विद्यार्थी सामोरे 
Updated on

जळगाव ः कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या (बॅकलॉगसह) विद्यार्थ्यांच्या परीक्षा १२ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा देताना ऐनवेळी उद्भवणाऱ्या कोणत्याही तांत्रिक व्यत्ययाची भीती बाळगू नये. कारण या विद्यार्थ्यांना विंडो कालावधी तीन तासाचा दिला जाणार आहे. असे आवाहन विद्यापीठाने केले आहे. 

यावर्षी प्रथमच ऑनलाइन परीक्षा होत आहेत. पदवी परीक्षेसाठी दीड तासाचा, तर पदव्युत्तर परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी देण्यात आला आहे. परीक्षा देताना ऐनवेळी वीज पुरवठा खंडीत झाला अथवा काही तांत्रिक व्यत्यय आला तर कसे होईल अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यादृष्टीकोनातून विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी. पी. पाटील यांनी काही तांत्रिक बाबींची माहिती विद्यार्थ्यांना दिली आहे. ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://nmu.unionline.in या लिंक वर जावे. त्याठिकाणी विचारण्यात आलेला User ID च्या ठिकाणी PRN No. टाकावा. Password साठी विद्यार्थ्याची जन्मतारीख हाच विद्यार्थ्याचा Password आहे (उदा. 06/10/99 ही जन्मतारीख असेल तर Password हा 061099 असा असेल). त्यानंतर Active Test वर क्लिक करून आपली विद्याशाखा (Faculty) आणि Program Name निवडायचा आहे. तो क्लिक केल्यानंतर शेवटी Course Code/Subject Name हे आपल्या वेळापत्रक / Hall Ticket वर दिल्याप्रमाणे निवडायचे आहे. 


त्यानंतर परीक्षेसाठी विद्यार्थी Login होईल. Login यशस्वी झाल्यानंतर फोटो ओळखपत्राची पडताळणी होईल व या पडताळणी नंतर परीक्षेला प्रारंभ होईल. Login करताना अयशस्वी झाल्यास विद्यार्थ्याने आपला Password हा बिनचूक आहे की नाही याची पडताळणी करावी. त्यानंतरही Login होत नसल्यास संकेतस्थळाच्या प्रशासकाशी परीक्षार्थी हा Chatbot द्वारे तात्काळ संपर्क साधू शकतो. त्याच्या शंकेचे लगेच निरसन केले जाईल. त्यानंतरही हा प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्याने Trouble Logging in चा पर्याय निवडावा त्यामध्ये विद्यार्थ्याने आपला PRN No. टाकावा विद्यार्थ्याने Reigstered केलेल्या मोबाईलची नोंद करावी व परीक्षा निवडावी त्यानंतर मोबाईलवर OTP प्राप्त होईल. तो OTP टाकल्यानंतर विद्यार्थी परीक्षेसाठी Login होईल. हा पर्याय देखील यशस्वी झाला नाही, तर विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाच्या असलेल्या आय.टी. समन्वयकाशी तात्काळ संपर्क साधावा. त्यांच्याकडून विद्यार्थ्याच्या शंकेचे निरसन केले जाईल. 

वाचा- केळी प्रश्नाबाबत खासदार रक्षा खडसेंनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट 

 
परीक्षा सुरळीत पार पाडा ः मंत्री पाटील 
विद्यापीठाच्या परीक्षांसाठी जिल्हा प्रशासन, महावितरण, परिवहन महामंडळ, पोलिस व आरोग्य विभाग यांनी सर्वतोपरी सहकार्य करून या परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात असे आवाहन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. परीक्षा केंद्रावर येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी योग्य त्या प्रतिबंधक उपाययोजना करून घेतली जावी, शक्य असेल तिथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तालुका स्तरावर परीक्षा देण्यासाठी सूचना कराव्यात, दिव्यांग विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाही याची काळजी घ्यावी, आवश्यक त्या परीक्षा केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त द्यावा अशा सूचना संबंधित विभागांच्या प्रतिनिधींना केल्या 

अंतिमवर्ष परीक्षार्थी असे 
परीक्षा देणारे विद्यार्थ्यांची संख्या ः ५३ हजार ५६४ 
ऑनलाइन परीक्षा देणारे विद्यार्थी ः ३९ हजार ९० 
ऑफलाईन परीक्षा देणारे विद्यार्थी ः १४ हजार ४७४  

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com